घरमनोरंजन'या' मराठी चित्रपटात पहिल्यांदाच थ्रीडी पोस्टरचा प्रयोग!

‘या’ मराठी चित्रपटात पहिल्यांदाच थ्रीडी पोस्टरचा प्रयोग!

Subscribe

राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटात कलाकार कोण हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपट प्रमोशनासाठी आतापर्यंत अनेक प्रयोग झाले. मात्र, रॉमकॉंम हा चित्रपट त्यात वेगळा ठरला आहे. या चित्रपटामुळे मराठीत पहिल्यांदा थ्रीडी पोस्टरचा प्रयोग करण्यात आला आहे.ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म यांनी “रॉमकॉम” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते आहेत. रेमोलो एंटरटेन्मेंटच्या
मोहन सचदेव यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

 

गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रॉमकॉम हा चित्रपट नावाप्रमाणेच रॉमकॉम आहे. राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटात कलाकार कोण हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

- Advertisement -

पहिल्यांदाच मराठीत थ्रीडी पोस्टर

आतापर्यंत थ्रीडी पोस्टरचा प्रयोग हॉलिवूडमध्ये आणि हिंदी चित्रपटांत करण्यात आला आहे. मात्र, मराठी चित्रपटांनी हा प्रयोग केला नव्हता. ती उणीव “रॉमकॉम” या चित्रपटानं भरून काढली आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाचे नायक- नायिका या दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्यावर हात ठेवले आहेत. त्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नाहीयेत.या अनोख्या थ्रीडी प्रयोगामुळे चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झाली असून येत्या १८ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -