घरमनोरंजन'हम दिल दे चुके सनम'पासून 'PS-1'पर्यंत 'या' चित्रपटांसाठी निर्मात्यांची पहिली निवड नव्हती...

‘हम दिल दे चुके सनम’पासून ‘PS-1’पर्यंत ‘या’ चित्रपटांसाठी निर्मात्यांची पहिली निवड नव्हती ऐश्वर्या

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध आणि लाडक्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज ऐश्वर्याचा 49 वा वाढदिवस आहे. 1994 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकलेल्या ऐश्वर्या रायने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्तम अभिनय, नृत्य कौशल्य आणि आकर्षक चेहरा यामुळे ऐश्वर्या नेहमीच चाहत्यांचे प्रेम मिळाले. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या ऐश्वर्याला त्या चित्रपटात काम देण्यासाठी पहिली पसंती देण्यात आली नव्हती. मात्र, त्यानंतर जेव्हा या चित्रपटांतील दमदार भूमिका साकारुन ऐश्वर्याने ते पात्र अजरामर केले.

देवदास

- Advertisement -


2002 साली प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ चित्रपटाचे आजही करोडो चाहते आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षितने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात ऐश्वर्याने पारो ही भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटासाठी ऐश्वर्याला निवडण्यापूर्वी संजय लीला भंसाळीने करीना कपूरला कास्ट करण्याचे ठरवले होते. मात्र, त्यानंतर काही कारणास्तव करीना ऐवजी ऐश्वर्याला कास्ट करण्यात आलं.

हम दिल दे चुके सनम

- Advertisement -


1999 साली प्रदर्शित झालेला ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटामध्ये देखील संजय लीला भंसाळीने ऐश्वर्याआधी करीनाची निवड केली होती. मात्र, करीना त्यावेळी वय कमी असल्याचे कारण देत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

उमराव जान


2006 साली प्रदर्शित झालेला ‘उमराव जान’ चित्रपटात ऐश्वर्या राय आधी प्रियांका चोप्राला कास्ट करण्याचे ठरले होते. मात्र, प्रियांकाच्या चित्रपटाची तारीख मिळत नसल्याने निर्मात्यांनी या चित्रपटात ऐश्वर्याला कास्ट केलं.

मोहब्बते


2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बते’ चित्रपटा ऐश्वर्याने अमिताभ बच्चनच्या मुलीची भूमिका साकारली होती. यश चोप्राने या चित्रपटात ऐश्वर्याआधी काजोलला निवडले होते. मात्र, काजोलने नकार दिल्याने ऐश्वर्याला यात काम करायची संधी मिळाली.

पोन्नियिन सेल्वन 1


नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ चित्रपटामध्ये ऐश्वर्याने राणी नंदिनी ही भूमिका साकारली. ऐश्वर्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून देखील कौतुक केले जात आहे. मात्र, या चित्रपटामध्ये देखील ऐश्वर्यापूर्वी मणि रत्नमने बॉलिवूड अभिनेत्री रेखाची निवड केली होती.

 


हेही वाचा :

तुमच्या बेडरूममध्ये हा प्रकार घडला तर…विराटच्या व्हायरल व्हिडीओवर अनुष्काने व्यक्त केला संताप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -