तुमच्या बेडरूममध्ये हा प्रकार घडला तर…विराटच्या व्हायरल व्हिडीओवर अनुष्काने व्यक्त केला संताप

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटर विराट कोहली वारंवार विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, आता विराट आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन विराटने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराटने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. खरंतर हा व्हिडीओ एका हॉटेल रुममधला आहे. जिथे विराट राहत होता. हा व्हिडीओ शेअर करत विराटने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, मला हा व्हिडीओ अजिबात आवडलेला नाही. कोणाच्या खाजगी गोष्टींमध्ये दखल देणं योग्य गोष्ट नाही. तसेच त्याने पुढे लिहिलंय की, मला हॉटेलमध्ये प्रायव्हसी मिळणार नसेल तर मी दुसऱ्या कुठल्यातरी ठिकाणी माझी प्रायव्हसीची अपेक्षा कशी करु शकतो का?”

अनुष्काने दिली प्रतिक्रिया

या व्हायरल व्हिडीओबाबत अनुष्काने देखील सोशल मीडियाद्वारे राग व्यक्त केला आहे. व्हिडीतील काही फोटो शेअर करत तिने लिहिलंय की, “याआधी देखील अशा अनेक घटना झाल्या आहेत. जेव्हा चाहत्यांनी आमच्यावर जरा तुम्हा दया दाखवली नाही. मात्र, हा प्रकार तर सर्वात खराब आहे. यामुळे मानवतेचं उल्लंघन झालं आहे. जो कोणी हे पाहतो आणि असा विचार करतो की जर तुम्ही सेलिब्रिटी असाल तर तुम्हाला डील करावी लागेल, तुम्ही देखील या समस्येचा एक भाग आहात हे समजले पाहिजे. थोडे आत्मसंयम ठेवावे. तसेच तुमच्या बेडरूममध्ये हा प्रकार घडला तर यात मर्यादा कुठे आहे?”

इतर कलाकारांनी दिली प्रतिक्रिया
विराट कोहलीच्या हॉटेल रुम व्हिडीओवर बॉलिवूडमधील कलाकारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता वरुण धवन, अर्जुन कपूर यांनी देखील या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.

 


हेही वाचा :

‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारचा झाला अपघात; रुग्णालयात करण्यात आलं दाखल