घरमनोरंजन'हर हर महादेव' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

ट्रेलरमध्ये बाजीप्रभूंच्या प्रेरणादायी कथेचे चित्रण करण्यात आले आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता ज्याने अनोखा रोमांचक असा अनुभव दर्शकांना दिला.

सध्या सर्वत्रच ‘हर हर महादेव’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक सुद्धा या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाचा ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर निर्मात्यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये बाजीप्रभूंच्या प्रेरणादायी कथेचे चित्रण करण्यात आले आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता ज्याने अनोखा रोमांचक असा अनुभव दर्शकांना दिला.

- Advertisement -

हा चित्रपट इतिहासातील सत्य आणि प्रेरणादायी कथेवर आधारित असून, बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली जिथे केवळ 300 मावळ्यांनी तब्बल 12000 शत्रू सैन्याला लढा देऊन विजय मिळवला. या पराक्रमाचे वर्णन या चित्रपटात केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हा पहिलाच बहुभाषिक चित्रपट असल्याने देशभरातील जनतेला देखील या रोमहर्षक इतिहासाचे साक्षीदार होता येणार आहे.

- Advertisement -

झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर आणि सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -