घरताज्या घडामोडीबीडमध्ये भाजपाच्या शहराध्यक्षाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

बीडमध्ये भाजपाच्या शहराध्यक्षाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Subscribe

भाजपाच्या शहराध्यक्षाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. भाजपाचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपाच्या शहराध्यक्षाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. भाजपाचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. (beed bjp city president bhagirath biyani committed suicide by shooting himself)

या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा अधिक तपास केला.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून हत्या केल्या. या घटनेनंतर बियाणीचे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने बियाणी यांच्या घरी धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी बियाणी यांच्या घराची पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यामुळे एकच खळबळ उडाली. बियाणी यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयात धाव घेतली. कार्यकर्ते आणि पोलिसांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. बियाणी यांच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.


हेही वाचा – भाजपाला टार्गेट करत, नेटकऱ्यांनी बाळासाहेबांच्या नावावरून शिंदे गटाला केले ट्रोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -