घरमनोरंजनगोव्यातील पार्टामध्ये ऋतिक आणि सुजैन आपल्या नव्या पार्टनर्स सोबत एकत्र

गोव्यातील पार्टामध्ये ऋतिक आणि सुजैन आपल्या नव्या पार्टनर्स सोबत एकत्र

Subscribe

ऋतिक रोशन त्याच्या नव्या गर्लफ्रेंड सबा आजाद सोबत आणि सुजैन खान तिचा नवा बॉयफ्रेंड अर्स्लान गोनी सोबत गोव्यामध्ये एकत्र पार्टी करताना दिसून आले.

मंगळवारी मुंबई एअरपोर्टवर एकीकडे ऋतिक रोशनला त्याची गर्लफ्रेंड सबा आजाद हिच्यासोबत हात हातात घेऊन फिरताना स्पॉट करण्यात आलं. याचं वेळी दुसरीकडे ऋतिकची आधीची पत्नी सुजैन खानसुद्धा त्याच अंदाजात तिचा नवा बॉयफ्रेंड अर्स्लान गोनी सोबत फिरताना दिसली आहे. इतकंच नव्हे तर, ऋतिक आणि सुजैन आपापल्या नव्या पार्टनर सोबत गोव्यातील एका पार्टीमध्ये एकत्र दिसून आले.

- Advertisement -

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ऋतिक रोशन त्याच्या नव्या गर्लफ्रेंड सबा आजाद सोबत आणि सुजैन खान तिचा नवा बॉयफ्रेंड अर्स्लान गोनीसोबत गोव्यामध्ये एकत्र पार्टी करत होते. खरं तर ही पार्टी पूजा बेदी हिची होती, ज्यामध्ये तिने ऋतिक आणि सुजैनला आपापल्या पार्टनर सोबत इनवाइट केलं होतं. पूजा बेदीने या पार्टीचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. मात्र या चौघांचे फोटो आता खूप वायरल होत आहेत. या पार्टीचे काही फोटो सुजैन खानची बहीण फराह खानने सुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

- Advertisement -

पार्टीच्या या फोटोंमध्ये ऋतिक रोशनने ब्लॅक टी-शर्टमध्ये आणि सबा पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे. तर सुजैन ब्लॅक ड्रेस आणि तिचा बॉयफ्रेंड प्रिंटेड शर्टमध्ये दिसत आहेत. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या फराह खान अली, जायद खान, अभिषेक कपूर यांसारख्या अनेकांनी हजेरी लावली होती. याचं पार्टीवरून परत येताना ऋतिक आणि सबाला स्पॉट करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे रात्री उशिरा सुजैन आणि अर्स्लानसुद्धा एकत्र दिसून आले.

सध्या ऋतिक त्याच्या ‘विक्रम वेधा’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -