घरलाईफस्टाईलWeight Loss : पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

Weight Loss : पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Subscribe

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेअभावी वर्कआउट (Workout) करायला मिळत नाही. अशा स्थितीत तंदुरूस्त राहण्यासाठी आणि वजन कमी करण्याची चिंता सर्वांना जाणवत असते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेअभावी वर्कआऊट (Workout) करायला मिळत नाही. अशा स्थितीत तंदुरुस्त राहण्यासाठी आणि वजन कमी करण्याची चिंता सर्वांना जाणवत असते. प्रमाणापेक्षा जास्त वजन (Weight) आणि दिवसेंदिवस लठ्ठ होत आहे, अशी वाक्य तुम्ही कित्येक लोकांच्या तोंडून ऐकली जातात. वजन वाढणे ही समस्या बहुतांश लोकांना सतावत असतात.

वर्कआऊट काय करावे आणि कोणतं डाएट फॉलो करायचं असे असंख्य प्रश्न प्रत्येकाला पडतात. वजन कमी करताना एक समस्या सारखी सतावत असते ती म्हणजे पोटाची चरबी. पोटाची चरबी (Belly fat) कमी करण्यासाठी काय करता येईल व त्यावर काय उपाय आहे हे चला जाणून घेऊ या.

- Advertisement -

1. सर्वांना माहीत आहे की, बदामामध्ये (Almonds) पोषक जीवनसत्त्वे असतात. 5 ते 6 बदाम जर तुम्ही खाल्ले तर तुमची भूक कमी होऊन तुम्हाला पुरेशी ऊर्जा मिळते.

2. जर तुम्ही तुमच्या आहारात किंवा चहामध्ये साखरेऐवजी दालचिनी वापरली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. दालचिनीमुळे (Cinnamon) तुमचा लठ्ठपणा कमी होण्यासाठी फायदा होतो.

- Advertisement -

3. सफरचंद (Apples) हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण सफरचंदामध्ये 4 ते 5 ग्रॅम फायबर असते. त्यामुळे खूप वेळ भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास त्याचा उपयोग होतो.

4. जर तुम्ही नेहमी थंड किंवा साधं पाणी पित असाल तर अशी चूक तुम्ही करू नका. जेव्हा तुम्हाला तहान लागत असेल तर तुम्ही कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपली पचनशक्ती अधिक वाढते आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते. याचा मोठा फायदा असा आहे की, पोटामध्ये जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होते.

5. सुक्या आल्याची पावडर म्हणजे थर्मोजेनिकचं स्त्रोत आहे. ज्यामुळे वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो.

6. सुक्या आल्याची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी उकळून घ्या. थोडाफार थंड करून ते प्यायल्याने तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -