घरमनोरंजनपाडवा स्पेशल: बने यांच्या घरातला खास पाडवा

पाडवा स्पेशल: बने यांच्या घरातला खास पाडवा

Subscribe

सोनी मराठीवरील ‘ह.म. बने तु.म. बने’ मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. बने कुटुंबीयांची वेगवेगळ्या निमित्ताने नेहमीच काहीतरी धमाल चालू असते. आपल्या रोजच्या जगण्यातले आपलेसे वाटणारे विषय ही मालिका मनोरंजनासोबत घेऊन येत असते. तर आता बने कुटुंब रमले आहे गुढिपाडव्याच्या सणात. गुढीपाडव्याचा मंगलमय सण म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. ही सुरुवात आपण गुढी उभारून व नव्या खरेदीने करतो. बने कुटुंबीयांनीही याचप्रकारे नववर्षाचे स्वागत गुढी उभारून केले आहे.

hum bane tum bane
हम बने तुम बने

बने आजी-आजोबा, दोन्ही मुले, सुना व नातवंडे असा सर्व परिवार गुढिपाडव्याचा आनंद साजरा करताना दिसेल. बने परिवाराच्या गमतीजमती आणि नात्यांचा जिव्हाळा यामुळे या आनंदोत्सवाला रंगत येणार हे नक्की. गुढीपाडव्याच्या गोडीत भर पाडणारा हा ‘ह.म. बने तु.म. बने’ चा हा भाग तुमच्या कुटुंबासह आवर्जून पहा.

- Advertisement -

‘ह.म. बने तु.म. बने’ ही लोकप्रिय मालिका नेहमीच आपल्या खुमासदार विनोदी शैलीत दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या प्रश्र्नांबद्दल भाष्य करत असते. मालिकेतील प्रत्येक भाग हा मनोरंजनासोबतच नकळत एक संदेश देऊन जातो. ‘ह.म.बने तु.म.बने’च्या या अस्सलपणा मुळेच ती प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. आता सर्वत्र निवडणूकीची धामधूम असताना अतिशय योग्य वेळ साधून ‘ह.म.बने तु.म.बने’ प्रेक्षकांना आपल्या मतदानाच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा भाग ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

हा ठरलेला सर्वाधिक प्रेक्षकपसंतीचा एपिसोड

- Advertisement -

ह.म.बने,तु.म.बने या मालिकेत कायमच वेगवेगळे विषय हाताळले जातात. त्यात मासिक पाळीबद्दल किती पुरुषांना माहीत आहे, हा विषय घेण्यात आला होता. घरात मुलगी एकटी असते आणि सोबत तिचे वडील. आई बाहेर गेलेली असते. अशा वेळी मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी सुरू होते. मग वडील काय करतात? कसं समजावून देतात? हे या भागात दाखवण्यात आलं होतं. या एपिसोडला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून या भागाचे पुर्नप्रक्षेपण दाखवण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -