घरमनोरंजनसहा महिने पडद्यावर दिसणार नाहीत बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी

सहा महिने पडद्यावर दिसणार नाहीत बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी

Subscribe

जेष्ठ अभिनेते आणि बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणून ओळखले जाणारे कलाकार आलोक नाथ यांच्यावर आईएफटीडीएने बंदी घातली आहे. #metoo मोहीमे अंतर्गत बाबूजीवर आरोप लावण्यात आले होते.

ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणून ओळखले जाणारे कलाकार आलोक नाथ गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. लेखिका-दिग्दर्शक विंटा नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर इंडियन फिल् अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (आयएफटीडीए) ने आलोक नाथ यांना  नोटीस जाहिर केली होती. अखेर आयएफटीडीएने गुरूवारी ही नोटीस स्विकारली. या मुळे आता आलोक नाथवर सहा महिन्यांची बंदी आणल्या गेली आहे. आयएफटीडीएचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हरॅस्मेंट (पोश) या समिती अंतर्गत चौकशी सुरु केली. त्यावेळी विंटा नंदा यांनी इंटरनल कम्प्लेंट्स कमिटी (आयआयसी) या समितीअंतर्गत आलोक नाथ यांना अनेक वेळा चौकशीसाठी बोलावले. मात्र त्यांनी बैठकीसाठी पुढाकार घेतला नाही म्हणून अखेर हा निर्णय देण्यात आला.

काय आहे प्रकरण

प्रसिद्ध लेखिका विंटा नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. त्याचसोबत अभिनेत्री नवनीत निशान आणि संध्या मुदुल यांनीही लैगिंक गैरवर्तनाचा आरोप केला होता. दुसरीकडे आलोकनाथ यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. दिग्दर्शक साजिद खान यांच्यावरही आईएफटीडीएने एक वर्षासाठी बंदी घातली आहे. मीटू या मोहीम अंतर्गत तनुश्री दत्ताने सुद्धा जेष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार केली होती. मीटू या मोहीमे अंतर्गत अनेक पीडित महिलांना वाचा फोडण्यासाठी मदत झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -