घरमनोरंजनIndia's Miss Universe 2021 : 'या' प्रश्नाचे उत्तर देऊन हरनाज संधूने जिंकला...

India’s Miss Universe 2021 : ‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन हरनाज संधूने जिंकला ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब

Subscribe

जग प्रतिष्ठीत सौंदर्यस्पर्धा ‘मिस युनिव्हर्स २०२१’ चा किताब यंदा भारताच्या हरनाज संधूने आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे २१ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भारताला हे विजेतेपद मिळाले आहे. यंदा इस्त्राइलमध्ये ही सौंदर्यस्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतींना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स २०२१’ चा मुकूट भारतात आणला. यापूर्वी अभिनेत्री लारा दत्त आणि सुष्मिता सेन यांनी भारतासाठी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. तर हरनाज आत्ता ‘मिस युनिव्हर्स’ची तिसरी भारतीय सौंदर्यवती ठरली आहे.

- Advertisement -

‘मिस युनिव्हर्स २०२१’ च्या पहिल्या फेरीत हरनाज संधूला पहिला प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न होता की, आजच्या काळात येणाऱ्या तणावांना कसं सामोरं जावं याविषयी तुम्ही तरुण महिलांना काय सल्ला द्याल”, यावर उत्तर देताना हरनाज म्हणाली की, स्वत:वर अतिविश्वास ठेवणं हा आजच्या तरुणाईवरील सर्वांत मोठा दबाव आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात याची जाणीव तुम्हाला अधिक सुंदर बनवते. स्वत;ची इतरांशी तुलना करणे थांबवा तसेच जगात घडणाऱ्या अधिक महत्वाच्या गोष्टींबद्दल बोला. समोर या, इतरांशी बोला, कारण तुमचे आयुष्य घडवणारे तुम्हीच आहात. तुम्हीच स्वत:चा आवाज आहात. मला माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच आज मी याठिकाणी उभी आहे.

- Advertisement -

‘टॉप ५’साठी विचारण्यात आलेले प्रश्न

“हवामान बदल अनेकांना फसवणूक वाटते. अशा लोकांना पटवून देण्यासाठी तुम्ही काय कराल?” असा प्रश्न टॉप ५ स्पर्धकांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना हरनाजने परीक्षकांसह चाहत्यांचे मनं जिंकली. हरनाजने उत्तर दिले की, “निसर्गासमोरील असंख्य समस्या पाहून मला दु:ख होतेय. मात्र हे सर्व आपल्या बेजाबदार वागण्यामुळे होतेय. आत्ता कमी बोलण्याची आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आहे. कारण प्रत्यक्ष कृती करुनचं निसर्गाला वाचवू शकते किंवा नष्ट करु शकते. पश्चात्ताप आणि दुरुस्ती करण्यापेक्षा प्रतिबंध आणि संरक्षण करणं कधीही चांगलं.”

याचदरम्यान हरनाजचा तिच्या आवडत्या प्राण्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने प्रेक्षकांना अभिवादन करत “तिला मांजर आवडते” असे हसून सांगितले. उपांत्य फेरी गाठण्यापूर्वी हरनाजने सांगितले की, “तुमच्या छंदाशी कधीही तडजोड करु नका, कारण ते तुमचे स्वप्नातील करिअर बनू शकते.”

या सौंदर्यस्पर्धेत पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतींना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर विजयी होता आले. मात्र भारताच्या हरनाजने ‘मिस युनिव्हर्स २०२१’ मध्ये टॉप फेव्हरेट स्पर्धक जागा मिळवत “मिस युनिव्हर्स २०२१’ वर आपले नाव कोरले. हरनाजने २०१७ मध्ये टाईम्स फ्रेश फेस बॅकमधून तिच्या सौंदर्य स्पर्धांच्या प्रवासाला सुरुवात केली. २१ वर्षीय दिवा सध्या पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतेय. तिने फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ सह अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकला आहेत. यासोबत अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.


Miss Diva Universe 2021 : २१ वर्षांनंतर भारताच्या हरनाज संधूला मिस युनिव्हर्स’चा किताब


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -