घरमहाराष्ट्रनाशिकअजब मागणी! प्राचार्यच म्हणतात ट्रिपल सीटला परवानगी द्या

अजब मागणी! प्राचार्यच म्हणतात ट्रिपल सीटला परवानगी द्या

Subscribe

राजूर तालुक्यातील एका महाविद्यालयातील प्राचार्यांनी पोलिसांना दिले निवेदन, विद्यार्थी-पालकांत संभ्रम

राजूर: बससेवा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना मोटरसायकलवरुन ट्रीपल सीट वाहतुकीस परवानगी द्या, अशी मागणी तालुक्यातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केली आहे. या अजब मागणीमुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. तर, प्राचार्यांचा फतवा पाहून विद्यार्थ्यांसह पालकांमधूनही आश्चर्य व्यक्त होते आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी महाराजा शिंदे महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला होता. या रॅगिंगमध्ये एका विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संप सुरू असल्याने शाळेत येण्यासाठी विद्यार्थी दुचाकींचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. मात्र, एका दुचाकीवर तीन ते चार व्यक्ती बसून प्रवास करत असल्याने अपघात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत दिवसभरात तब्बल अनेक दुचाकींवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तपासणी करत वाहन चालविण्याचा परवाना नसलेले, वय पूर्ण नसलेले, वाहन नावावर नसलेल्या व्यक्तींविरुद्ध कारवाई केली. दुसरीकडे मात्र, खुद्द महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलिसांना साकडे घालत बससेवा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना गाडीवरून ट्रिपल सीट येण्यास परवानगी द्या, अशी अजब विनंती केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आता कायद्याच्या शिक्षणाची गरज नेमकी कुणाला, असा सवाल सूजाण पालकांकडून केला जातो आहे.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -