घरमनोरंजनजॅकलिन फर्नांडिसने मुंबईत खरेदी केलं नवीन घर

जॅकलिन फर्नांडिसने मुंबईत खरेदी केलं नवीन घर

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, अशातच जॅकलिनने मुंबईत एक नवीन आलिशान घर खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे.ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यापूर्वी जॅकलिन प्रियांका चोप्राच्या जुहू येथील घरात राहत होती, जे तिने 2021 मध्ये घेतले होते.

जॅकलिन फर्नांडिसने खरेदी केलं नवीन घर

जॅकलिन फर्नांडिसने पाली हिल, वांद्रे येथे तिचे नवीन घर विकत घेतले आहे. ज्या ठिकाणी जॅकलिनने तिचे नवीन घर विकत घेतले आहे. त्याठिकाणी अनेक कलाकार राहतात. या आसपासच्या परिसरात सैफ अली खान, करीना कपूर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील राहतात. जॅकलिनच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलिनची बिल्डिंग दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

- Advertisement -

जॅकलीन फर्नांडिसचे नवीन घर एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये आहे. तिचे हे घर जवळपास 1119 चौरस ते 2557 चौरस मीटरपर्यंत पसरले आहे. या घराची किंमत 12 कोटी रुपये आहे.

जॅकलीनचा आगामी चित्रपट

जॅकलीन आगामी काळात वैभव मिश्राच्या ‘फतेह’ चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये ती सोनू सूद आणि विजय राज यांच्यासोबत दिसणार आहे. तिने यावर्षी मार्चमध्ये क्राईम अॅक्शन चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले. याशिवाय ती आदित्य दत्तच्या ‘क्रॅक – जीतेगा तो जीएगा’ या अॅक्शन स्पोर्ट्स चित्रपटातही दिसणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

करीना कपूर-तब्बूचा ‘द क्रू’ चित्रपट 2024 मध्ये होणार प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -