घरमनोरंजननातीच्या पॉडकास्टमधून जया बच्चन यांचं स्त्रियांच्या संवेदनशील विषयावर बोट

नातीच्या पॉडकास्टमधून जया बच्चन यांचं स्त्रियांच्या संवेदनशील विषयावर बोट

Subscribe

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र, त्या त्यांच्या खासगी आयुष्यात मनमोकळ्या आहेत. याबाबत त्यांची नात नव्या नवेली नंदाने खुलासा केला आहे. श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा सध्या आजी जया बच्चन आणि आई श्वेतासोबत एका पॉडकास्टची रिलीज लाँच करत आहे. प्रत्येकवेळी त्यांची पॉडकास्ट येताच ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. या पॉडकास्टमध्ये नव्या नवेली नंदा आपल्या आजी आणि आईसोबत अनेक विषयांवर चर्चा करते. विशेष गोष्ट अशी की, या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री जया बच्चनने यांनी संवेदनशील विषयांवर चर्चा केली आहे.

मासिक पाळीबद्दल काय म्हणाल्या जया बच्चन?

 

View this post on Instagram

 

A post shared by @ivmpodcasts

- Advertisement -

नुकत्याच रिलीज झालेल्या नव्या नवेली नंदाच्या नव्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी आपल्या नातीसोबत मासिक पाळी या विषयावर मनमोकळ्या पणाने संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणीबद्दल सांगितलंय की, त्या काळी जेव्हा व्हॅनिटी व्हॅन्स नसायच्या त्यावेळी शूटिंगच्या वेळी खूप कठिण समस्या निर्माण व्हायच्या. त्यावेळी अभिनेत्रींना झाडा-झुडपांमध्ये लपून कपडे बदलावे लागायचे. ही परिस्थिती खूप कठिण असायची. तसेच जया बच्चन पुढे म्हणाल्या की, त्या काळी सॅनेटरी पॅड्सदेखील नसायचे. तेव्हा सॅनेटरी टॉव्हेल्सचा वापर केला जायचा. शिवाय त्याला कुठेही उघड्यावर देखील फेकता येत नसे. त्यामुळे वापरलेल्या टॉव्हेल्सला पिशवीमध्ये पॅककरुन शूटिंगवरुन परतताना रस्त्यावर थांबून एखाद्या सुरक्षित जागी फेकलं जायचं. ही परस्थिती खूप कठिण असायची.

दरम्यान, यापूर्वी जया बच्चनने नव्या नवेली नंदाच्या या आधीच्या एका पॉडकास्टमध्ये एक अनोखं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्या नव्याला लग्नाआधी तू आई झालीस तरीही मी नाराज होणार नाही असं म्हणाल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या की, आज लोग एक्सपेरिमेंट करु शकतात. त्यांच्या काळी हे शक्य नव्हतं.

- Advertisement -

 


हेही वाचा :

समंथाचा ‘यशोदा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट, जमवला मोठा गल्ला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -