घरलाईफस्टाईलWinter Food: हिवाळ्यात 'हे' पदार्थ करणार तुमचे सर्दी, खोकल्यापासून संरक्षण

Winter Food: हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ करणार तुमचे सर्दी, खोकल्यापासून संरक्षण

Subscribe

थंडीच्या दिवसांत असे काही पदार्थ तुमचा सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करु शकतात. या पदार्थांच्या सेवनामुळे तुम्ही थंडीतही फिट अँड फाईन राहू शकता. तसेच अनेक आजारांपासून संरक्षण करता येते. जाणून घेऊ नेमके हे पदार्थ कोणते आहेत.

संत्री

संत्री
संत्री

थंडीच्या दिवसांत शरीराला व्हिटॉमिन्स आणि अँटीऑक्सीडेंट्स संत्रेतून मिळते. त्यामुळे थंडीत संत्री खाणे फायदेशीर मानले जाते. तसचे जिभेची चव टिकून राहावी यासाठीही संत्रं खायला हवे. संत्र खाण्याचे तसेच अनेक फायदे आहेत. यामुळे तुमची त्वचा मुलायम राहते, पोटातील गॅस कमी होतो, किडनी स्टोनच्या आजारापासून संरक्षण मिळते, रक्तदाब नियंत्रणात राहते. याशिवाय शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्य़ासाठी संत्रे खाणे अतिशय चांगले मानले जाते.

- Advertisement -

मसाले चहा

मसाला चहा
मसाला चहा

लवंग आणि दालचिनी घातलेला मसाले चहा थंडीच्या दिवसांत तुम्हाला खूप फायदेशीर ठरते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शिवाय थकवा, मरगळ दूर होण्यास मदत होते. मसाले चहातील लवंग शरीराच्या वेदना कमी करण्यास खूप प्रभावी आहे. सर्दीपासून बचाव करण्यास मसाले चहा फायदेशीर आहे.

लसूण

लसूण
लसूण

भरपूर प्रमाणात पोषण तत्व असणारे लसूण खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे दिसून येतील. लसणात अँटी इंफ्लामेट्री आणि मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे थंडीच्या दिवसांत तुम्हाला व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहता येते. लसूण रोगप्रतकारशक्ती वाढवते. शिवाय उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्य़ास मदत होते. डायबेटिसच्या रुग्णांसाठीही लसूण फायदेशीर असते.

- Advertisement -

हळद

हळद
हळद

थंडीच्या दिवसात दूधात हळद टाकून पिल्याने खूप फायदा होतो. कारण हळदीत कॅल्शिअम, आर्यन, सोडियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबरची मात्रा असते. यामुळे शरीरातील अनेक समस्यांना तोंड देण्यास मदत करतात. यामुळे अन्न पचण्यास देखील मदत होते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

मध

मध
मध

थंडीच्या दिवसात मध शरीरासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. मध आणि आल्याचा रस करुन पिल्यास घशातील खवखव कमी होते. तसेच खोकल्यापासून बचाव करता येतो.


Government Job : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये तब्बल ४१ हजार पदं रिक्त, जाणून घ्या रिक्त पदांची संख्या


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -