घरलाईफस्टाईलजोडीदाराचा राग असा करा शांत

जोडीदाराचा राग असा करा शांत

Subscribe

नातेसंबंध म्हटलं की त्यात वाद विवाद, रुसवा, फुगवा, अबोला या गोष्टी आल्याच. पण त्यातही जर तो वाद जर जोडीदाराबरोबर झाला असेल तर मग काही खरं नाही. कारण प्रेमात भांडल्याने प्रेम वाढतं असं किती जरी म्हटल तरी जर हा वाद विकोपाला गेला तर मात्र दोघांमध्ये कायमचा दुरावा येण्याची शक्यता असते. त्यातून मग ब्रेक अप ही होऊ शकतो. हे सर्व काही टाळायचं असेल तर काय करावे यासाठी काही टीप्स.

जर तुमच्यात आणि जोडीदारामध्ये सतत लहान सहान गोष्टींवरून वाद होत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण सततच्या वादाने नात्यामधील ओलावा संपतो. एकमेकांबद्दलच प्रेमही अटू लागत. ओढ कमी होते. यामुळे चर्चेतून वाद सोडवा.

- Advertisement -

एकमेकांना स्पेस द्या

भांडणामध्ये बऱ्याचवेळा काहीजण रागात एकमेकांना तोंडात येईल ते बोलतात. यामुळे समोरची व्यक्ती दुखावते. कधी कधी हे बोलणे आतून असंत कारण समोरची व्यक्ती तुमच्या वागण्याने मनातून दुखावलेली असते. अशावेळी त्याला अजून न डिवचता चूक कबूल करावी आणि समोरच्याला स्पेस द्यावी. यामुळे काहीवेळानंतर दोघांचा राग शांत होईल.

- Advertisement -

वादाचे मूळ शोधा, त्यावर चर्चेतून तोडगा काढा

बऱ्याचवेळा वादामागचे कारण हे एकमेकांच्या भावना समजून न घेणे, समोरच्याला गृहीत धरणे यावरून होतात.अशावेळी तुमच्या भांडणाचे मूळ कारण काय यावर विचार करावा. त्यावर दोघांनी संगनमताने काय तोडगा करता येईल ते बघावे. मार्ग नक्कीच मिळेल.

अहंकार बाजूला सारून सॉरी बोलावे

बऱ्याचेवळा दोन भिन्न विचारांच्या व्यक्ती प्रेमात पडतात. सुरुवातीला सगळं ठिकठाक असतं नंतर मात्र कुरबुरी वाढतात. एकाचा विचार दुसऱ्याला पटत नाही आणि दुसऱ्याला त्याबद्दल विचार करण्यात स्वारस्य राहात नाही. अशावेळी वाद न वाढवता. ज्याची बाजू पडेल असते त्याने सॉरी बोलून वाद संपवावा. कधी कधी तुमच्या दृष्टीकोणात तुम्ही बरोबर असता पण समोरच्याच्या मते तुम्ही चुकलेले असता. त्या चुका दाखवताना त्याने जर ते मुद्देसूद मांडले तर समजून जा की नक्की तुमचेच चुकले आहे. माफी मागा वाद मिटवा.

वाद संपवण्यासाठी मित्रांची मदत घ्या

जोडप्यामध्या वादाचे मूळ कारण सहसा अपेक्षा हेच असते. पण समजा तुमचा जोडीदार स्वभावाने हट्टी असेल तुम्ही कितीही त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न केलात तरी त्याचा राग शांत होत नसेल तर मित्रांची मदत घ्या. कारण जोडीदाराचा तुमच्यावरचा विश्वास डळमळीत झालेला आहे. त्यामुळे त्याला तुमचे म्हणणे पटणार नाही. पण थर्ड पार्टी म्हणून मित्र नक्कीच यात तटस्थ भूमिका बजावेल.

जोडीदाराबरोबर बोला, वाद मिटवा

रागावलेला माणूस हा त्या वेळेपुरता इमोशनल झालेला असतो. कुठेतरी दुखावलेला असतो. त्याच्या भावना समजून घ्या. त्याच्या रागाचे कारण समजून घ्या. नंतर त्याचा राग शांत करण्यासाठी त्याच्याशी शांतपणे बोला. एकत्र कॉफी घ्या. एकमेकांना वेळ द्या.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -