घरमनोरंजनकाजोलने बॉलिवूडमध्ये केली ३० वर्ष पूर्ण, पोस्ट शेअर करत अजय देवगणने दिल्या...

काजोलने बॉलिवूडमध्ये केली ३० वर्ष पूर्ण, पोस्ट शेअर करत अजय देवगणने दिल्या शुभेच्छा

Subscribe

अजय देवगणने सुद्धा आपली पत्नी काजोलचे अभिनंदन करत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तान्हाजी चित्रपटातील फोटोसुद्धा शेअर केला आहे

अभिनेत्री काजोल ९० च्या काळातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोलने आत्तापर्यंत बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. नुकतेच तिने या इंडस्ट्रीमध्ये ३० वर्ष पूर्ण केले आहेत. या निमित्ताने तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या ३० वर्षाचा प्रवास दिसून येत आहे. शिवाय अजय देवगणने सुद्धा ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.

काजोलचा ३० वर्षाचा प्रवास

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

- Advertisement -

काजोलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या चित्रपटाचं नाव आणि काजोलचे चित्रपटातील लूक दिसत आहेत. अशाप्रकारे काजोलने एक-एक करत तिचे ३० वर्षातील हिट चित्रपट आणि लूक दाखवले आहेत.

अजय देवगणवने सुद्धा शेअर केली पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

- Advertisement -

अजय देवगणने सुद्धा आपली पत्नी काजोलचे अभिनंदन करत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तान्हाजी चित्रपटातील फोटोसुद्धा शेअर केला आहे. त्या पोस्टखाली कॅप्शनमध्ये अजयने लिहिलंय की, “चित्रपटसृष्टीत तीन दशक आणि तू धमाका करून टाकलास. खरं सांगायचं तर तू अजून सुरूवात करत आहेस.आणखी अनेक चित्रपट आणि आठवणींसाठी”

‘बेखुदी’ चित्रपटातून केलं होतं काजोलने पदार्पण
काजोलने १९९२ साली ‘बेखुदी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जो ३१ जुलै १९९२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात काजोलसोबत अभिनेते कमल सदाना दिसून आले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल रवैल यांनी केले होते.


हेही वाचा :शम्मी कपूर आणि मुमताजच्या प्रेमाचा का झाला शेवट?

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -