घरमनोरंजनजेहसोबत खेळतोय सैफ, करीनाने शेअर केला क्यूट फोटो

जेहसोबत खेळतोय सैफ, करीनाने शेअर केला क्यूट फोटो

Subscribe

बॉलिवूड कलाकारांच्या घरी देखील दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. अभिनेत्री करीन कपूरनेही यंदा कुटुंबियांसोबत दिवाळी सेलिब्रेशनचा आनंद घेतला. यंदाची दिवाळी करीना- सैफसाठी अधिकचं स्पेशल आहे कारण जेहची यंदाची पहिली दिवाळी आहे. दिवाळीनिमित्त करीनाने नुकताच एक खास फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये सैफ अली खान लेकं जेहसोबत मस्ती करतोय. या फोटोने आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सैफ अली खान आणि जेहचा हा क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सैफ अली खानसोबत जेह मस्तीच्या मूडमध्ये दिसतोय. मात्र या फोटोमध्येही जेहचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. फोटो शेअर करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रेम आणि प्रकाश. यासह तिने एक हार्टची इमोजी शेअर केली आहे. सध्या सोशल मीडियावरही हा फोटो तुफान व्हायरल होतोय.

- Advertisement -

करीनाने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकाऱ्यांकडूनही भन्नाट कमेंट्स येत आहेत. अनेक चाहत्यांनी करीना -सैफ कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला आत्ता पर्यंत मिलियनहून अधिक लाईक्स मिळालेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -