घरमनोरंजनShehzada : कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' चित्रपटाच्या शुटींगचा श्रीगणेशा

Shehzada : कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ चित्रपटाच्या शुटींगचा श्रीगणेशा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकताच त्याचा आगमी शहजादा’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमुळे आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. कार्तिकने आगामी चित्रपट ‘धमाका’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज केल्यानंतर आता त्याने ‘शहजादा’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. अभिनेता सध्या बॅक टू बॅक विविध प्रोजेक्ट्सच्या घोषणा आणि शूटिंग शेड्यूलमध्ये अतिशय व्यस्त आहे.

कार्तिकने आपल्या इंस्टाग्रामवर क्लैपर फोटो शेअर करताना लिहिले की, “#Shehzada 👑 shuru..” न थांबता, अथकपणे शेड्यूलवर काम करताना, कार्तिक चोवीस तास काम करत आहे, मग ते शूटिंग असो, प्रमोशन असो किंवा लॉन्च इवेंट. कार्तिक आर्यन आपला आगामी चित्रपट ‘शहजादा’मध्ये पहिल्यांदा दिग्दर्शक रोहित धवनसोबत काम करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

- Advertisement -

या चित्रपटात ‘लुकाछुपी’मधील त्याची सहकलाकार कृति सेननसोबत तो पुन्हा झळकणार आहे. याशिवाय मनीषा कोइराला आणि परेश रावल हे देखील सहाय्यक भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट अल्लू अर्जुनचा ओरिजनल चित्रपट ‘अला वैकुंठपुरमुलु’चा रिकेम आहे. त्यामुळे कार्तिक आर्यन आत्ता अल्लू अर्जुनच्या पावलावर पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. २०२० मध्ये सर्वाधिक हिट चित्रपटांमध्ये या सिनेमाचे नाव घेण्यात आले होचे. त्यामुळे त्याचा हिंदी रिमेक आता तयार करण्यात येत आहे.

- Advertisement -

कार्तिककडे आगामी चित्रपटांची भली मोठी रांग असून ‘धमाका’, ‘भूल भुलैया 2’, अलाया एफसोबत ‘फ्रेडी’ यासोबतच आता ‘शहजादा’चा समावेश होत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -