घरताज्या घडामोडीKatrina Kaif-Vicky Kaushal Wedding: दोन पद्धतीत पार पडणार विक्की कतरिनाचा विवाह...

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding: दोन पद्धतीत पार पडणार विक्की कतरिनाचा विवाह सोहळा

Subscribe

पहिला लग्न सोहळा भारतीय पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे तर दुसरा लग्न सोहळा हा ख्रिश्चन पद्धतीने

बॉलिवूड सध्याच चर्चेतील कपल म्हणजे विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला काहीच दिवस उरले आहेत. बॉलिवूडचं हे क्यूट कपल लवकरत विवाह बंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नाचा माहोल सध्या बॉलिवूडमध्ये पहायला मिळत आहे. आपले आवडते कलाकर आयुष्यभरासाठी एकत्र येणार हे पाहून फॅन्स फारच आनंदी झाले आहेत.लग्न सोहळ्यात विक्की आणि कतरिनाने कोणतीही कसर सोडलेली नाही कारण विक्की आणि कतरिना लग्नाच्या बातम्यांमधून एक नवी माहिती समोर येत आहे ती म्हणजे दोघेही दोन वेळा लग्न करणार आहेत.

प्रियंका चौप्रा आणि निक जोनस यांच्यासारखंच विक्की आणि कतरिना देखील हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहे. राजस्थानच्या बरवाडा फोर्टवर आज दोघेही दाखल होणार आहेत. कुटुंब आणि मित्रमैत्रीणींच्या सानिध्यात दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. पहिला लग्न सोहळा भारतीय पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे तर दुसरा लग्न सोहळा हा ख्रिश्चन पद्धतीने पार पडणार आहे. दोघांनाही या दोन वेगवेगळ्या लुकमध्ये पाहण्यासाठी दोघांचेही चाहते फारच आतुर आहेत.

- Advertisement -

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, कतरिना आणि क्की कौशल यांचा लग्नसोहळा दोन दिवस रंगणार आहे. आधी भारतीय हिंदू पद्धतीने आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीने पार पडणार आहे. दोघांनीही इंडियन आणि वेस्टर्न वेडिंगसाठी थीम देखील फायनल केली आहे. दोन्ही लग्नासाठी खास डेकोरेशन देखील असणार आहे. लग्नासाठी कुटुंब जवळचे मित्र मैत्रिणी आणि बॉलिवूडमधील काही महत्त्वाच्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत. ज्यांना लग्नाला येत येणार नाही त्यांच्यासाठी दोघांनी एक ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे.


हेही वाचा – जॅकलिन फर्नांडिसला मुंबई विमानतळावरून घेण्यात आले ताब्यात, शोसाठी जात होती परदेशात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -