घरताज्या घडामोडीइस्लाम धर्म नसून दहशतवादी गट, हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर वसीम रिझवींचे वादग्रस्त वक्तव्य

इस्लाम धर्म नसून दहशतवादी गट, हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर वसीम रिझवींचे वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

इस्लाम धर्मीय वसीम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर रिझवींनी मुस्लिम धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल आहे. इस्लाम हा धर्म नसून दहशतवादी गट असल्याचे वसीम रिझवी यांनी म्हटलं आहे. रिझवींनी धर्म स्वीकारल्यानंतर आता त्यांचे नाव हरबीर नारायण सिंह त्यागी असे ठेवण्यात आले आहे. गाझियाबादमधील दासना देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी रिझवींच धर्म परिवर्तन केल आहे. वसीम रिझवी यांना मुस्लिमांनी बहिष्कृत केलं आहे. कुराणमधील श्लोकांविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यामुळे रिझवी यांच्याविरोधात मुस्लिम समाज संतप्त झाला आहे.

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मुस्लिम धर्माविरोधात घणाघात केला आहे. हिंदू धर्म यांना सनातन धर्म मिळवून दिला असून त्यांचे नावही बदलण्यात आले आहे. मुस्लिम लोकांनी इस्लाम धर्मातून बहिष्कृत केले यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हा माझा निर्णय आहे. जगातील पहिला धर्म हा सनातन आहे. यामध्ये मानवता आणि चांगुलपणा आढळतो असे वक्तव्य रिझवींनी केलं आहे.

- Advertisement -

इस्लाम हा धर्म नाही आहे. मोहम्मद पैगंबर यांनी निर्माण केलेला इस्लाम धर्म वाचून तसेच त्यांचा दहशतवादी चेहरा पाहिला असल्यामुळे तो धर्म नाही हे आता समजलं आहे. इस्लाम धर्म १४०० वर्षांपूर्वी अरबस्तानमध्ये तयार झाला आहे. हा धर्म नसून एक दहशतवादी गट आहे. जुम्मा आणि प्रार्थनेनंतर आम्हाला मुंडके कापण्यासाठी सांगितले जाते. मुस्लिम म्हणायला मला लाज वाटत असल्यामुळे धर्म परिवर्तन केलं असल्याचे वसीम रिझवी यांनी म्हटलं आहे.

वसीम रिझवी यांचे गाझियाबादमधील दासना देवीच्या मंदिरात महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी सर्व विधींनुसार हिंदू धर्मात परिवर्तन करत आहेत. रिझवींचे शुद्धीकरण देखील करण्यात येत आहे.

- Advertisement -

मृत्यू पत्र आणि कुराणमधील श्लोकविरोधात याचिकेमुळे चर्चेत

वसीम रिझवी यांनी काही दिवसांपुर्वी मृत्यूपत्र जारी केले आहे. या मृत्यू पत्रात त्यांनी मृतदेह दफन न करता हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात यावे असे म्हटलं आहे. तसेच नरसिंहानंद गिरी महाराजच चीतेला अग्नी देतील असे रिझवी यांनी मृत्यूपत्रात म्हटलं आहे. कुराणमधील २६ श्लोकांविरोधात रिझवींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुराणमधील २६ श्लोक काढून टाकण्याची मागणी रिझवी यांनी केली होती.


हेही वाचा : Aung San Suu Kyi Jailed: यामुळे नोबेल विजेत्या आंग सान सू की यांना ४ वर्षांचा तुरुंगवास


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -