घरक्रीडाBirthday Special: बुम बुम बुमराहच्या वाढदिवसानिमित्त पत्नीने दिलं खास गिफ्ट

Birthday Special: बुम बुम बुमराहच्या वाढदिवसानिमित्त पत्नीने दिलं खास गिफ्ट

Subscribe

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा आज(सोमवार) वाढदिवस आहे. बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ रोजी अहमदाबादमध्ये झाला होता. बुमराहने अगदी कमी वेळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभाग घेतला आहे. बुमराह भारतातच नाही तर जगभरातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराहच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी संजना गणेशनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. तसेच हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. संजनाने बुमराहसोबत एक प्यारीवाली लव्हस्टोरी सारखा एक फोटो शेअर केला आहे. फोटोवर एक कॅप्शन सुद्धा देण्यात आला असून चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.

- Advertisement -

संजनाने फोटो शेअर करत लिहिलंय की, ती जागा जिथे तुझ्या आयुष्यात मी कायम राहू शकते. संजनाच्या या रोमँटीक लाईनवर बुमराहने सुद्दा प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशनचं लग्न १५ मार्च २०२१ रोजी झाली होती. संजना एक टीव्ही आणि सोर्ट्स प्रझेंटर आहे. आताच टी-२० वर्ल्डकपच्या दरम्यान संजना आयसीसीसाठी अँकरींग करताना दिसली होती. बुमराहच्या वेगवान गोलंदाजीला रेस्ट देण्यात आलं आहे. बुमराह न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात कसोटी मालिकेचा भाग नाहीये. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर बुमराह पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी करताना दिसणार आहे.

- Advertisement -

बुमराह भारताच्या सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना त्याच्याकडून अधिक अपेक्षा केल्या जात आहेत. बुमराहने आपल्या कारकिर्दीत २४ कसोटी सामन्यांत १०१ विकेट्स, ६७ एकदिवसीय मालिका आणि १०८ विकेट्स घेतले आहेत. तसेच ५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ६६ विकेट्स घेतले आहेत. संपूर्ण टी-२० सामन्यांत २३७ विकेट्स आपल्या नावावर केले आहेत. तर आयपीएलमध्ये ४ एप्रिल २०१३ रोजी मुंबई इंडियन्समध्ये त्याने सुरूवात केली. बुमराहला आयपीएलमध्ये मुंबईकडून रिटेन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला मुंबईने १२ कोटी रूपयांमध्ये रिटने केलं होतं. त्याशिवाय हिटमॅन रोहित शर्माला १६, सूर्यकुमारला ८ कोटी आणि पोलार्डला ६ कोटी रूपयांमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने पुन्हा एकदा घेतलं होतं.


हेही वाचा: R Ashwin : अश्विनने घरच्या मैदानावर ३०० बळी केले पूर्ण; कुंबळेच्या या विक्रमाची केली बरोबरी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -