घरमनोरंजनपुन्हा 'कौन बनेगा करोडपती'

पुन्हा ‘कौन बनेगा करोडपती’

Subscribe

अमिताभ बच्चन पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर

‘नमश्कार, देवीयों और सज्जनो’ हा संवाद पुन्हा एकदा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात प्रेक्षकांना  ऐकू येणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ चा दहावा सीझन लवकरच सुरु होणार असून त्याच्या पहिल्या प्रोमोतून अमिताभ बच्चन यांनी या क्विझ शो साठी नोंदणी करण्याची घोषणा केली आहे. ६ जूनपासून रात्री ८.३० वाजता यासाठी नोंदणी करण्यात येणार असल्याचे दिल्लीमधील पत्रकार परिषदेत अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

प्रोमोमधून नोंदणीबद्दल माहिती

‘हर जवाब पूरा करेगा आपका एक अधुरा ख्वाब’ असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी या प्रोमोमधून यावेळचा वेगळेपणा सांगितला आहे. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत केबीसीच्या आठ सीझनचे निवेदन केले असून प्रत्येक हंगाम यशस्वी करून दाखवला आहे.

- Advertisement -

‘कौन बनेगा करोडपती’ने लाखो भारतीयांना आपले नशीब बदलण्याची संधी दिली. केबीसीमुळे फॅमिली गेम शो ची परिभाषाच बदलली. केबीसीच्या २ हंगामासाठी बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खाननेदेखील निवेदन केले होते. मात्र या दोन्ही सीझनमध्ये शाहरूख आपली जादू प्रेक्षकांवर दाखवू शकला नाही. मात्र अमिताभ यांचे सगळे सीझन लोकांनी नेहमीच उचलून धरले आहेत.

बिझनेस हेड दानिश खानचा विश्वास

गेल्या वर्षी ७ दिवस नोंदणीसाठी ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये साधारण १.९८ कोटी लोकांनी आपल्या नावाची नोंद केली होती. यावेळी नोंदणीसाठी १४ दिवस ठेवण्यात आले असून यावेळीदेखील नक्कीच यश मिळेल, अशी आशा सोनी टीव्हीचे बिझनेस हेड दानिश खान यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -