घरमनोरंजन'विक्रम वेधा'च्या प्रदर्शनापूर्वीच केआरकेने दिली प्रतिक्रिया

‘विक्रम वेधा’च्या प्रदर्शनापूर्वीच केआरकेने दिली प्रतिक्रिया

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी केआरके तुरूंगातून बाहेर आला. तुरूंगातून बाहेर आल्या आल्या त्याने 'ब्रह्मास्त्र' वर ताशेरे ओढले होते. दरम्यान, 'ब्रह्मास्त्र'नंतर केआरकेने त्याचा मोर्चा विक्रम वेधा चित्रपटाकडे वळवलेला आहे.

बॉलिवूड चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान म्हणजेच केआरके कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चांगलाच चर्चेत असतो. याचं कारण म्हणजे केआरके करत असलेले चित्रपटांचे समीक्षण हे आहे. अनेकदा केआरके चित्रपटांचे समाक्षण अशा प्रकारे करतो की त्या चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या समीक्षणाचीच जास्त चर्चा होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केआरके तुरूंगातून बाहेर आला. तुरूंगातून बाहेर आल्या आल्या त्याने ‘ब्रह्मास्त्र’ वर ताशेरे ओढले होते. दरम्यान, ‘ब्रह्मास्त्र’नंतर केआरकेने त्याचा मोर्चा विक्रम वेधा चित्रपटाकडे वळवलेला आहे.

केआरकेचं ट्वीट चर्चेत
केआरकेने ट्वीटवर आगामी चित्रपट विक्रम वेधावर निशाणा साधला आहे. त्याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत लिहिलं की, “मी विक्रम वेधाचा रिव्यू नक्कीच करणार. परंतु असं तेव्हा होईल जेव्हा बॉलिवूडमधील लोक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मला तुरूंगात पाटवणार नाहीत.”

- Advertisement -

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केआरकेने यावेळी ट्वीटमध्ये मोजक्या शब्दांतच आपलं मत मांडलं. याआधी केआरकेने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाई वरून लिहिलं होतं की, मी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे समीक्षण केलं नाही. परंतु तरीही लोक चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत. कारण हे एक डिजास्टर आहे. आशा आहे की यांच्या अपयशाला त्यांनी मला ब्लेम करू नये. जसे बाकीचे लोक करतात.

या दिवशी होणार ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित
‘विक्रम वेधा’ 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये ऋतिक रोशनव्यतिरिक्त सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. सैफ अली खान चित्रपटात ‘विक्रम’ ही भूमिका साकारणार आहे तर ‘वेधा’ ही भूमिका ऋतिक साकारणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरूख खानचा ड्युप्लीकेट पाहिलात का?

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -