घरताज्या घडामोडीलता मंगेशकर गाणार होत्या 'द काश्मीर फाईल्स'मध्ये गाणं, विवेक अग्निहोत्रींनी इच्छा राहिली...

लता मंगेशकर गाणार होत्या ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये गाणं, विवेक अग्निहोत्रींनी इच्छा राहिली अधुरी

Subscribe

सगळं काही चांगलं सुरू होत. कोरोना संपल्यानंतर रेकॉर्डींग करण्याचे ठरले पण अशातच लता दीदी आपल्या सगळ्यांना सोडून गेल्या. लता दीदींसोबत मी काम करू शकलो नाही याचा खेद मला आयुष्यभर राहिल.

नव्वदच्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित द काश्मीर फाईल्स ( The Kashmir Files)  या सिनेमाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटर्समध्ये हजेरी लावत आहेत. सिनेमा पाहिल्यानंतर अनेक जण भावूक झालेत. देशातील अनेक राज्यांनी सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा धमाकेदार कमाई करत आहे. सिनेमाच्या इतक्या मोठ्या यशानंतरही सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri)  मात्र निराश आहे. सिनेमा तयार करण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली परंतु सिनेमाला दिवगंत गायिका लता मंगेशकरांचा (Lata Mangeshkar ) आवाज देण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. होय द काश्मीर फाईल्स सिनेमात लता दीदी एक गाणं गाणार होत्या. ( Lata Mangeshkar was to sing in vivek agnihotris The Kashmir Files)

विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलेय, सिनेमाचा कंटेंट इतका पावरफूल होता की यात कोणतेही गाणं सामाविष्ट करण्याची कोणतीही गरज नव्हती. परंतु अशातच आम्ही सिनेमात एक फॉल्क साँग करण्याची योजना आखली. आमची इच्छा होती की हे गाणं लता दीदींनी गावे. आम्हाला हेही माहिती होतं की लता दीदी आता गाऊ शकत नव्हत्या. परंतु तरीही आम्ही त्यांना विनंती केली होती. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सिनेमात गाणं गाण्याची हमी आम्हाला दिली होती. माझी पत्नी पल्लवी जोशी हिच्याशी दीदींचे फार जवळचे संबंध होते. सगळं काही चांगलं सुरू होत. कोरोना संपल्यानंतर रेकॉर्डींग करण्याचे ठरले पण अशातच लता दीदी आपल्या सगळ्यांना सोडून गेल्या. लता दीदींसोबत मी काम करू शकलो नाही याचा खेद मला आयुष्यभर राहिल.

- Advertisement -

द काश्मीर फाईल्स हा सिनेमा देशभरात तगडी कमाई करतो आहे. सिनेमाला अनेक जण टार्गेट करत आहेत. परंतु अशा परिस्थितीतही बॉक्स ऑफिसवर सिनेमाने ११ दिवसात १८० करोड रुपयांचा बिझनेस केला आहे. सिनेमाचे एकूण बजेट २५ करोड होते. सिनेमा आणखी तगडी कमाई करेन यात काही शंका नाही.


हेही वाचा –  ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या कोटामध्ये 21 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -