घरताज्या घडामोडी'लाव रे तो व्हिडीओ' म्हणणारे नोटीशीमुळे बदलले याच आश्चर्य, सुप्रीया सुळेंची राज...

‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणणारे नोटीशीमुळे बदलले याच आश्चर्य, सुप्रीया सुळेंची राज ठाकरेंवर टीका

Subscribe

राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानंतर भूमिका कशी बदलली याचे आश्चर्य वाटत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात जातीयवादावरुन राजकारण केलं असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर लाव रे तो व्हिडीओपासून ते नोटीशींपर्यंतचे काढून पलटवार केला आहे. राष्ट्रवादीमुळे जातीपातीचे राजकारण सुरु झाले असा आऱोप त्यांनी यापूर्वीसुद्धा केला होता यामध्ये काही नवीन नाही. परंतु लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे बदलले याचे आश्चर्य आणि कौतुक वाटत असल्याचे म्हणत सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर घणाघात केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज ठाकरेंनी जातीपातीचे राजकारण केलं असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाची सुरुवात झाली. असे राज ठाकरेंनी पूर्वीसुद्धा बोलले आहे. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या ५५ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाही मनसेला याची गरज नाही असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

- Advertisement -

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, लाव रे तो व्हिडीओ म्हणत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या विकासाचा बुरखा फाडणारे राज ठाकरे यांचा प्रवास कुठल्या दिशेला होतोय हे सांगण्याची काही आवश्यकता वाटत नाही. राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानंतर भूमिका कशी बदलली याचे आश्चर्य वाटत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राजकारणासाठी भावनिक विषयाला हात

विरोधकांना विकासावर बोलण्यासाठी काही राहिले नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विकासकामे केली असल्यामुळे त्यावर टीका करण्यासारखे काही राहिले नाही. यामुळे भावनिक विषयांवर राजकारण सुरु आहे. परंतु असे राजकारण देशाच्या आणि राज्याच्या हिताचे नाही असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवारांनी सर्व जातीधर्मीयांना नेतृत्वाची संधी दिली अन् हा पठ्ठ्या म्हणतो…, अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -