घरताज्या घडामोडीSujat Ambedkar : आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा बोलायला लावा, सुजात आंबेडकरांचे...

Sujat Ambedkar : आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा बोलायला लावा, सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना आवाहन

Subscribe

राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांना केलेल्या मशिदीच्या भोंग्याचे आवाहन आता चांगलेच रंगू लागले आहे. मशिदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसेचे भोंगे लावा असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर घाटकोपरच्या परिसरात मनसैनिकांनी मशीदीसमोर भोंगेही लावले, काही तासातच हे भोंगे पोलिसांनी काढले. राज ठाकरेंच्या आवाहनावर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरेंना आधी हनुमान चालीसा बोलायला लावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर पक्ष भाड्याने लावून प्रचार करत फिरा, पण हिंदु मुस्लिम दंगलींवर आपला पक्ष उभारू नका असेही आवाहन त्यांनी राज ठाकरेंना केले आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये सुजात आंबेडकर सक्रीय होत आहे. त्याची सुरूवात कुर्ला येथे एका बाईक रॅलीच्या माध्यमातून सुजात आंबेडकरांनी केली.

अमित ठाकरेंना आधी हनुमान चालीसा म्हणायला लावा असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना केले आहे. दंगली झाल्या तर पोलिसांनी माहितेय कोणाला पकडायच आहे. राज ठाकरेंनी मशिदीवर भोंग्यांच्या निमित्ताने वक्तव्य केले होते. मशिदीवरील भोंग बंद होत नसतील तर हनुमान चालीसा मोठ्या आवाजात लावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले होते. राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत सुजात आंबेडकर यांनी टिप्पणी केली आहे. मशीदीसमोर हनुमान लावण्याच्या चालीसेला आमचा पाठिंबा आहे. पण हे करायला एकही बहुजन मुलगा तिथे नको. राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा बोलायला लावावे, हीच एक अट असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

हनुमान चालीसा म्हणायला जे लोक जात आहेत, त्या लोकांनी जान्हव दाखवाव. एकही बहुजन मुलगा मला तिथे नकोय अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना आवाहन दिले. राज साहेबांना विनंती घ्या, तुमचा पक्ष दुसऱ्याच्या प्रचाराला भाड्याने लावा, पण हिंदु मुस्लिम दंगलीवर तुमचा पक्ष उभा करू नका हीच कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस जर गंदल झाली तर तुम्हाला माहितेय कोणाला पकडायच आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशीदीवरील भोंग्याचा उल्लेख करताना सर्व काही मतांसाठी सुरू असल्याचा आरोप केला होता. माझा प्रार्थनेला विरोध नाही, पण प्रार्थना करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही, याचीही काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले होते. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. मशिदींवरील भोंग्याबाबत मी याआधीही बोललो आहे, राज्य सरकार भोंगे काढणार नसेल तर भोंग्याविरोधात दुप्पट स्पिकर लावून आम्ही हनुमान चालीसा वाजवू असाही इशारा राज ठाकरे यांनी पाडवा मेळ्याव्यात दिला होता.

- Advertisement -

Raj Thackeray mosques Loudspeaker : मशीदीचे भोंगे बंद होत नसतील, तर लाऊड स्पिकरवर हनुमान चालीसा लावा – राज ठाकरे

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -