घरमनोरंजन'लव्ह लफडे' चित्रपटातून मराठीत नवा प्रयोग

‘लव्ह लफडे’ चित्रपटातून मराठीत नवा प्रयोग

Subscribe

लव्ह लफडे हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठीत पहिल्यांदाच आगळावेगळा प्रयोग होत आहे.

नवीन चित्रपट येणार म्हटलं की तो कोणत्या सिनेमागृहात पाहायला मिळणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होताना आपण पाहत असतो. मात्र असा एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, जो सिनेमागृहात रिलीज न होता चक्क ऑनलाईन ‘अॅप’ वर रिलीज होणार आहे. लव्ह लफडे असे या मराठी चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट काही तरुणांनी एकत्र येऊन तयार केला आहे. येत्या २० जुलै रोजी एचसीसी नेटवर्क या अॅपवर हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.

पडद्यामागील टीम

या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केले आहे. तर कथा-पटकथा संजय मोरे यांची आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे. तरुणाईने सजलेल्या या चित्रपटाला संगीत देखील तरुणाईला साजेसे असे आहे. प्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर आणि अनय नाईक यांनी तरुणांना मंत्रमुग्ध करेल असे संगीत दिले आहे. या गीतांना तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्ते, मंगेश बोरगावकर, मुग्धा कऱ्हाडे, रोहित राऊत, भारती मढवी या ताज्या दमाच्या गायकांनी स्वरसाज चढविलेला आहे.

- Advertisement -

हे कलाकार करणार लव्ह लफडे

रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे चेहरे या चित्रपटात असून अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते, भाग्येश केम्भवी व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -