घरमनोरंजन#MeToo : 'आलोकनाथ यांचं हे रुप धक्कादायक'

#MeToo : ‘आलोकनाथ यांचं हे रुप धक्कादायक’

Subscribe

'आलोकनाथ सारख्या व्यक्तीचं मीटू मोहिमेत नाव जोडलं जाणं हे माझ्यासाठी धक्कादायक होतं', असं वक्तव्य माधुरी दीक्षितने केलं आहे.

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातलेल्या #Metoo वादळाने, आता पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. बॉलीवूडचे ‘बापूजी’ आलोकनाथ यांच्यावरही मीटू मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण बराच काळ गाजलं. काही कलाकारांनी आलोकनाथ यांच्यावर आरोप लावले तर काहींनी त्यांची बाजू घेतली.  दरम्यान, याप्रकरणी आता धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपलं मत नोंदवलं आहे. आलोक नाथ यांचे ‘हे’ नवे रुप मला माहीत नव्‍हते, अशी प्रतिक्रीया माधुरीने दिली आहे. ‘आलोकनाथ यांची हा बाजू माझ्यासाठी धक्कादायक असल्याचं’, माधुरीने म्हटलं आहे. माधुरी दीक्षित आणि आलोकनाथ यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘जमाई राजा’, ‘हम तुम्हारे हैं सनम’ यांसारख्‍या अनेक हिंदी चित्रपटांमधून एकत्र काम केले आहे. माधुरीच्या या प्रतिक्रियेमुळे मध्यंतरी शमलेलं #मीटू वादळ पुन्हा एकदा घोंगावण्याची भीती आहे.

काय म्हणाली माधुरी?

एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखात देतेवेळी माधुरी दीक्षितला आलोकनाथ प्रकरणाबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, की ‘आलोकनाथ सारख्या व्यक्तीचं मीटू मोहिमेत नाव जोडलं जाणं हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. त्यांचा हा चेहरा माझ्यासाठीही नवीन होता.’ दरम्यान, लैंगिक अत्याचाराप्रकरणी आलोकनाथ यांच्यावर लावलेले आरोप खरे आहेत की खोटे? यावर बोलणं माधुरीने टाळलं. दुसरीकडे माधुरीच्या गुलाब गँग चित्रटाचा दिग्दर्शक सौमिक सेम याच्यावरही असभ्य वर्तनाचा आरोप लावण्यात आला होता. याविषयी बोलताना माधुरी म्हणाली, ‘सौमिकचं नाव या प्रकरणात आल्यामुळे मला खूप दु:ख झालं आहे. मला या गोष्टीची खंत वाटते.’ ‘ज्यावेळी तुम्ही जवळून ओळखत असलेल्या एखाद्या व्यक्तीवर अशाप्रकरचे आरोप लावले जातात, त्यावेळी आपण त्या व्यक्तीला खरंच ओळखतो का? अशी शंका येते’, अशी प्रतिक्रियाही तिने दिली.


पाहा : निक जोनास ‘जुमांजी’मध्ये साकारणार ‘हे’ पात्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -