घरमनोरंजनसलमानच्या चित्रपटातून मराठमोळा श्रेयस 'आऊट' तर आयुष शर्मा 'इन'

सलमानच्या चित्रपटातून मराठमोळा श्रेयस ‘आऊट’ तर आयुष शर्मा ‘इन’

Subscribe

सूत्रांच्या माहितीनुसार सलमानने या चित्रपटातून अभिनेता अरशद  वारसी आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांना काढून टाकले आहे. सलमानने आता या दोघांच्या जागी त्याच्या आवडीच्या लोकांना कास्ट केलं आहे.

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र, या चित्रपटाबाबत एक आश्चर्याची घटना समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सलमानने या चित्रपटातून अभिनेता अर्शद वारसी आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांना काढून टाकले आहे. सलमानने आता या दोघांच्या जागी त्याच्या आवडीच्या स्टार्सला  कास्ट केलं आहे.

सलमानने दाखवली दादागीरी
सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खानने ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात आयुष शर्मा आणि जहीर इकबाल यांना अर्शद वारसी आणि श्रेयस तळपदे यांच्या जागी रिप्लेस केलं आहे. फरहाद सामजी यांच्या चित्रपटात आता सलमान खान सोबत आयुष शर्मा आणि जहीर इकबाल त्याच्या भावांच्या भूमिकेत दिसणार  आहेत. तसेच अभिनेत्री पूजा हेगडे सलमानच्या प्रेमिकेच्या भूमिकेत असेल. शिवाय साउथचा सुपरस्टार व्यंकटेशही सलमान सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -

बहिणीच्या नवऱ्याला केलं कास्ट
आयुषने या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आयुष आणि जहिरच्या कास्टींमध्ये किती तथ्य आहे, हे अजून ऑफिशियल कंफर्म झालेलं नाही. परंतु हे खरं झालं तर सलमान खानला त्याच्या आवडीच्या लोकांना कास्ट करतो. असं म्हटलं जाईल.

सलमान खानचा हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी रिलीज होईल.तसेच याचे शुटिंग मे महिन्यापासून सुरू होईल. या चित्रपटात पहिल्यांदाच सलमान खान आणि पूजा हेगडे यांची जोडी दिसूण येईल.

- Advertisement -

या चित्रपटाशिवाय सलमान खान टायगर ३ मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २१ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

चंद्रा आणि दौलतची प्रेमकहाणी ‘चंद्रमुखीचा’ ट्रेलर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -