घरमनोरंजनवसुंधरा दिनानिमित्त 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' मालिकेच्या कलाकारांनी केलं वृक्षारोपण

वसुंधरा दिनानिमित्त ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेच्या कलाकारांनी केलं वृक्षारोपण

Subscribe

आज जागतिक वसुंधरा दिन वसुंधरा म्हणजे पृथ्वी ! या दिवसाचे महत्त्व सांगत हिंदी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या महामालिकेतील कलाकारांनी आज मालिकेच्या सेटवर जागतिक वसुंधरा दिन साजरा केला. हा दिवस साजरा करण्यासाठी मालिकेच्या अवघ्या टीमने सेट परिसरात रोपट्यांची लागवड केली. आपल्या ग्रहाची म्हणजेच पृथ्वीची जपणूक करणे किती महत्त्वाची आहे, असा लाखमोलाचा संदेश देत. या मालिकेच्या कलाकारांपैकी एतशा संझगिरी, गौरव अमलानी, स्नेहलता वसईकर आणि वल्लरी विराज जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. हीच आजच्या घडीची गरज आहे. एकत्र येऊन आपण धरतीमातेचे संरक्षण करू शकतो. ‘इच वन प्लांट वन’ म्हणजेच प्रत्येकाने एकतरी रोपटे लावावे.

या मालिकेतील अहिल्याबाईंची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री एतशा संझगिरी यावेळी म्हणाली की, ”जेव्हा वसुंधरा दिन येतो आपण त्याची तितकीशी दखल घेत नाहीत. इतर कुठल्याही दिवसासारखे आपण त्याकडे बघतो. यात बदल घडवून आणण्याची गरज आहे. आपण आपल्या धरणीमातेबाबत जास्त आस्था दाखवण्याची आवश्यकता आहे. या धरणीने आपल्याला निसर्गाचे खूप काही देणं दिलं आहे. त्यातील कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी राहणारी नाही. यामुळे जबाबदार नागरिक म्हणून तिचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. तंत्रज्ञानामुळे आज आपले जीवन अधिक सुखकर झाले आहे. त्याचवेळी आपण त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून राहायला नको. कारण त्याचा पर्यावरणावर प्रचंड दुष्परिणाम होत आहे. ते आपल्या ग्रहाला गुदमरून टाकत आहे. यंदाच्या वसुंधरा दिनी आम्ही आमच्या सर्व चाहत्यांना विनंती करू इच्छितो की, आपल्या ग्रहासाठी गुंतवणूक करा. वृक्षारोपणाच्या माध्यमातून, जल संवर्धनातून आणि शक्य तितक्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर टाळून हा मार्ग अवलंबवावा. यासोबतच तुम्हाला जेव्हाकेव्हा एखादे रोपटे दिसेल अन् तुमच्या वॉटर बॉटलमध्ये पाणी उरलेले असेल तेव्हा ते पाणी फेकून न देता त्या रोपट्याला घाला. आपली धरित्री एकेकाळी हिरवीगार होती, आता हे दृश्य अतिदुर्मिळ झाले आहे. चला तर मग, आपल्या ग्रहाला पुन्हा हिरवेगार करूयात. तसेच आपल्या धरणीतमातेला एक सुंदर स्थळ करण्यासाठी मदतीचा हात देऊयात. ‘इच वन प्लांट वन!’ पृथ्वीतलावरचे रहिवासी म्हणून आपण आपली जबाबदारी निभावूयात!”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -