घरमनोरंजनSuyash Tilak: सुयश टिळक येतोय नव्या रुपात नव्या मालिकेत

Suyash Tilak: सुयश टिळक येतोय नव्या रुपात नव्या मालिकेत

Subscribe

अभिनेता सुयश टिळकनं मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. त्यानं आपल्या अभिनयानं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी सुयश एक आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेत सुयशनं साकारलेली जयराम भूमिका चांगलीच गाजली. आता लवकरच सुयश नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ, सहज नाही लागणार ह्या आदिशक्तीचा ठाव”, असं म्हणत ‘सन मराठी’ने नुकताच ‘आदिशक्ती’ मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुयश टिळक महत्त्वाच्या भूमिकेत दिसतोय. कोण कोणाच्या विरोधात उभं राहिल, कोण कोणाचा शत्रु बनेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही आणि वडीलांची शत्रु स्वत: त्यांची मुलगी असेल तर काय… भितीने थरकाप उडेल अशी घटना चिमुकल्या जीवाशी घडणार असेल तर आईचं काळीज घाबरणारच… पण आई लेकीच्या संरक्षणासाठी आदिशक्तीकडे प्रार्थना करणार आणि तिच्या पाठीशी उभी राहणार दैवी शक्ती, हे या प्रोमोमधून दाखवण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

- Advertisement -

 रोमांचक, थरारक, कथेशी खिळवून ठेवणारी कथा घेऊन ‘सन मराठी’ वाहिनी नव्या पध्दतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. दैवी शक्ती नेहमी चांगल्या कर्माच्या, माणसांच्या पाठीशी उभी असते हे या मालिकेतून अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच सुयश टिळक, पल्लवी पाटील, सावी केळकर, अंबरिश देशपांडे, सुश्रुत आदी कलाकारांचा अभिनय अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळतेय, ‘आदिशक्ती’ मालिका 6  मे पासून सुरू होणार असून रात्री 8.30 वाजता सन मराठी चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -