घरगणपती उत्सव बातम्यामराठी कलाकार रंगले 'बाप्पाच्या' आठवणीत!

मराठी कलाकार रंगले ‘बाप्पाच्या’ आठवणीत!

Subscribe

गणपती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्याच्या येण्याने सगळ्यांची विघ्न, दु:ख, समस्या दूर होतात. या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच एक महिना आधीपासूनच तयारी सुरु करतात. यात कलाकारही मागे नाहीत. आपल्या गणपतीच्या आठवणींमध्ये हे मराठी कलाकार रंगले आहेत.

भाद्रपदाची चाहूल लागताच सगळ्यांच्याच अंगात उत्साहात संचारतो. चहुकडे गणरायाच्या मूर्ती, कंठी, सजावटीची साधने, मखर, ढोल-ताशा घेऊन गणरायाच्या स्वागतासाठी तयार होतात. गणपती बाप्पा येणार या कल्पनेनेच सगळ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. गणपती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्याच्या येण्याने सगळ्यांची विघ्न, दु:ख, समस्या दूर होतात. या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच महिन्याभरापासूनच तयारी सुरु करतात. यात आपले मराठी कलाकारही मागे नाहीत. आपल्या गणपतीच्या आठवणींमध्ये हे कलाकारं रंगले आहेत.

Bhagyeshree Limaye
भाग्यश्री लिमये

गणेशोत्सव म्हणजे माझ्यासाठी उत्साहाला उधाण आणणारा, समाजाभिमुख करणारा सण. आमच्या कॉलनीत आम्ही गणपती बसवायचो. रात्री गणपतीच्या आरतीला झांजा वाजवायला मला खूप आवडायचं. रात्री आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटायचं आणि उरलेला प्रसाद सर्वांच्या घरी पोहोचता करायचं काम आम्हा छोट्या मंडळींवर होतं. हे काम केल्याबद्दल आम्हाला दुप्पट प्रसाद मिळायचा जो खूप चविष्ट लागायचा! इतका कि बस्स! त्या प्रसादाचं खूप अप्रूप वाटायचं. आमच्या घरी पाच दिवस गणपती असतात. पण, पाचव्या दिवशी गणपतीला विसर्जन करताना खूप उदास वाटतं.

भाग्यश्री लिमये, घाडगे अॅण्ड सून

Sachit Patil
सचित पाटील

बाप्पाच्या असंख्य आठवणी आहेत. लहानपणापासूनच्या किती सांगू आणि किती नाही असं होतं. माझ्या आजीकडे गणपती बाप्पा येतो. आम्ही सगळी भावंडं मिळून बाप्पाच्या आगमनाची वाट अगदी आतुरतेने बघत असायचो. यानिमित्ताने सगळं कुटुंब एकत्र यायचं जसं अजूनही येतं. दादरमध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये खूप चैतन्यमय वातावरण असतं. त्या दिवसांचीच एक आठवण सांगायची म्हणजे दादरमध्ये जेवढे सार्वजनिक गणपती आहेत, तिथे आमच्या लहानपणी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. आणि आमची आजी आम्हाला तिथे घेऊन जायची. मला असं वाटत या क्षेत्रात येण्याची बिजं कुठेतरी तिकडे रोवली गेली.

सचित पाटील, अभिनेता

Harshada Khanvilkar
हर्षदा खानविलकर

माझं आणि बाप्पाचं खूप खास नातं आहे असं मी समजते. मला असं वाटत कि, त्याचं देखील माझ्यावर प्रेम आहे. मला छोट्या छोट्या अशा खूप प्रचिती येत असतात. मुळात माझ्या वडिलांची खूप श्रद्धा होती गणपतीवर. माझा स्वभाव खूप श्रद्धाळू आहे. माझ्या घरात बरेच छोटे मोठे गणपती आहेत, जे मला भेट म्हणून मिळाले आहेत. दर मंगळवारी मला कोणी ना कोणीतरी भेट म्हणून गणपती देतं. माझी अशी श्रद्धा आहे कि दर मंगळवारी मला बाप्पा भेट देतो. माझी आणि गणपतीची मैत्री आहे, मी त्याला माझा खूप मोठा आधार मानते.

हर्षदा खानविलकर, अभिनेत्री

Sangram Samel
संग्राम समेळ

लहानपणी गणपतीची सुट्टी पडली की मी माझ्या आजोळी जात असे. तिकडे सोसायटीच्या गणपतीला वेगवेगळे कार्यक्रम आणि स्पर्धा असायच्या. मी फॅन्सी ड्रेस आणि चित्रकला स्पर्धेत आवर्जून भाग घ्यायचो. तुमच्यातले कलात्मक गुण अशाच स्पर्धांमधून ठळक होत असतात असं मला वाटतं. माझ्या घरीही दरवर्षी बाप्पाचं अगदी थाटामाटात आगमन होतं. यंदा समेळांच्या बाप्पाचं ७५वं वर्ष आहे. त्यामुळे डबल सेलिब्रेशन असणार आहे. बाप्पा तुझा आशिर्वाद असाच आम्हा सर्वांच्या पाठीशी राहो हीच इच्छा मी व्यक्त करेन.

संग्राम समेळ, अभिनेता

 

माझं बालपण सोलापुरातल्या माणिक चौकात गेलं. तिथे आजोबा गणपतीचं मंदिर सुप्रसिद्ध आहे. या गणपतीला सुमारे १३२ वर्षांची परंपरा आहे. नावाप्रमाणेच गणपतीची मूर्ती आपल्याला आजोबांसारखी भासते. गणेशोत्सवाच्या काळात इथे एक वेगळंच चैतन्य असतं. डोळे दिपवणारी रोषणाई, भक्तांच्या रांगा आणि बाप्पाचं डोळ्यात साठवून ठेवावं असं रूप. आम्हा मित्रांचं लहानपणी एक लेझिम पथक होतं. मीही त्यात सहभागी होत असे. गणेशोत्सवाच्या काळात आम्ही बाप्पासमोर लेझीम खेळायचो. ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. गेल्या १० वर्षांत कामाच्या गडबडीमुळे मी जाऊ शकलो नाही. पण यंदा मात्र मी आवर्जून सोलापुरातल्या माझ्या आजोबा गणपतीचं दर्शन घेणार आहे!

अक्षर कोठारी, अभिनेता

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -