घरमनोरंजनराष्ट्रीय रंगोत्सवात मराठी एकांकिका

राष्ट्रीय रंगोत्सवात मराठी एकांकिका

Subscribe

महाराष्ट्रात नाट्य चळवळ मोठ्या प्रमाणात होत असली तरी भारतातील सर्वच राज्यात थोड्या फार प्रमाणात नाट्यकला हा कलाप्रकार जपला जात आहे. अर्थात त्याला नावं वेगवेगळी असली तरी त्यात अभिनय प्रामुख्याने आहे. कर्नाटकात नामा तुलूवेर कला संघटनेच्यावतीने मुद्रादी राष्ट्रीय रंगोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दक्षिणेतील नाट्य संस्थांना प्राधान्य देताना यात विविध राज्यातील नाट्य संस्थांनासुद्धा निमंत्रित केले जाते. आजपासून या रंगोत्सवाला प्रारंभ होणार आहे. तो 13 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अभिजित झुंझारराव दिग्दर्शित दोन एकांकिका इथे सादर होणार आहेत.

अभिजित अभिनेता, दिग्दर्शक म्हणून परिचयाचा आहे. प्रायोगिक रंगभूमीवर नोंद घ्यावी अशी कामगिरी त्याने केलेली आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या सर्वच नाटकांना स्पर्धेत मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. राज्य, कामगार नाट्य स्पर्धेत अनेक पुरस्कार त्याला प्राप्त झालेले आहेत. अशांती पर्व आणि युरेका या त्याच्या कलाकृतींचे कौतुक झालेले आहे. जयंत पवार आणि प्रदीप राणे यांनी लिहिलेल्या या एकांकिका 10 फेब्रुवारी कर्नाटकात सादर केल्या जाणार आहेत. तेलगू, कोंकणी, हिंदी, कन्नड याही नाटकांचा यात समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -