घरमुंबईराज्यात १३२० मेगावॉटची भर

राज्यात १३२० मेगावॉटची भर

Subscribe

कोराडी संचाचा मेकओव्हर

वाढत्या विजेची मागणीमुळे महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे नवीन दोन वीज निर्मिती संच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकी 660 मेगावॉट क्षमतेचे कोळशावर आधारीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानाचा वापर करून वीज निर्मिती करणारे दोन संच उभारण्यात येणारर आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेत वीज निर्मिती क्षमतावाढीच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली.

आगामी काळातही महाराष्ट्रृात विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये व जनतेला विजेच्या संकटाचा सामना करावा लागू नये या उद्देशानेच ऊर्जा विभागाने हा प्रस्ताव शासनासमोर सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली. महावितरणच्या अंदाजानुसार वर्ष 2023-24 मध्ये 27000 पेक्षा अधिक मागणी होण्याची शक्यता आहे. सन 2023-24 साठ़ीचा 25 हजार मेगावॉट वीजपुरवठा लक्षात घेता 2019 मेगावॅट विजेची तूट भासू शकते. महानिर्मितीची सध्याची एकूण निर्मिती क्षमता 13602 मेगावॉट असून त्यापैकी 10170 मेगावॉट वीज कोळशावर आधारित आहे. कोळशावर आधारित क्षमतेपैकी महानिर्मितीचे 1680 मेगावॉट क्षमतेचे जुने संच बंद करावे लागणार आहेत.

- Advertisement -

या प्रकल्पात संच क्रमांक 1 काम पूर्ण होण्यासाठी 45 महिने व संच क्रमांक 2 पूर्ण होण्यासाठी 51 महिने लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी 80 टक्के रकक्म कर्ज रुपाने तर 20 टक्के भागभांडवलातून उभारण्यात येणार असे प्रस्तावात म्हटले आहे.

संच क्रमांक 6 चे नूतनीकरण
महानिर्मितीच्या कोराडी संच क्रमांक 6 चे कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी 486 कोटी व महाराष्ट्र शासनाकडून 96 कोटींच्या भागभांडवल उभारणीस आज मान्यता देण्यात आली. या संचाच्या नूतनीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाच्या सुधारित खर्चास 563.12 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -