घरमुंबईस्वस्त घरांचे स्वप्न गोरेगावात साकार होणार

स्वस्त घरांचे स्वप्न गोरेगावात साकार होणार

Subscribe

म्हाडाचा ८ हजार २५९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर ,१ हजार ९४७ घरे बांधणार

मुंबईतल्या परवडणार्‍या दरातील घरांची व्याख्या ही डोळे विस्फारणारी असली, तरीही म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार्‍यासाठी सहाय्यभूत ठरणारा अर्थसंकल्प मंगळवारी म्हाडात मांडण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून स्वस्त घराचे स्वप्न गोरेगावसारख्या ठिकाणी साकार होणार आहे. वर्ष २०१९-२० सालचा अर्थसंकल्प म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मंगळवारी मंजूर झाला. अर्थसंकल्पातील तगड्या तरतुदीमुळे पहाडी गोरेगाव येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ हजार ९४७ घरे मुंबई मंडळाअंतर्गत बांधण्यात येणार आहेत.

म्हाडा प्राधिकरण बैठकीत मंजूर झालेला ८ हजार २५९ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प हा मुंबईसह राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांना चालना देणारा आहे. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळासह म्हाडाच्या कोकण, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद मंडळासाठी काही कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. म्हाडाकडून राज्यात परवडणार्‍या घरांच्या निर्मितीसाठी भूखंडाचे सर्वेक्षण सुरू आहे.

- Advertisement -

भविष्यकालीन आवश्यकता विचारात घेता जमीन खरेदी आणि विकासासाठी १०० कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात म्हाडाच्या सर्वच मंडळांच्या वसाहतींच्या पायाभूत सुविधांकरिता ५०० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये मलनि:सारण प्रकल्पांपासून ते इतर सेवासुविधा देणार्‍या कामाचा समावेश आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून इमारतींची देखभाल-दुरुस्ती साठी ५ कोटी २८ लाख तसेच संक्रमण शिबिराचा पुनर्विकास आणि देखभाल दुरुस्तीसाठी ५ कोटी प्रस्तावित आहेत. बीडीडी चाळींच्या विकास प्रकल्पासाठीही या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -