घरमनोरंजन#MeToo: सैफ म्हणतो माझाही झाला होता विनयभंग

#MeToo: सैफ म्हणतो माझाही झाला होता विनयभंग

Subscribe

आतापर्यंत अभिनेत्री समोर येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत होत्या, मात्र आता एक अभिनेताही म्हणतोय की माझ्यावर देखील अत्याचार झाला होता.

#MeToo या चळवळीत पुढे काय वाढून ठेवलंय! हे कुणीच सांगू शकत नाही. रोज एखादी अभिनेत्री, मॉडेल, पत्रकार माध्यमांसमोर येऊन आपली कैफियत मांडत आहे. अनेक बडे अभिनेते, राजकारणी, संपादक #MeToo वादळाच्या तडाख्यात फसले आहेत. तर दुसऱ्या बाजूला एक महिला दुसऱ्या महिलांवर विनयभंग केला असल्याची तक्रार करत आहे. मात्र या सर्व गदारोळात एक धक्कादायक गोष्ट आता समोर आली आहे. आतापर्यंत कुणीच असा दावा केला नव्हता. मात्र सैफने केलेल्या एका वक्तव्यामुळे विनयभंगाला फक्त महिलाच नाही तर पुरुषही बळी पडतात, असे वास्तव समोर आले आहे.

मला माहितीये, विनयभंगाचा त्रास काय असतो… 

एक वृत्तसंस्थेला मुलाखत देताना सैफ म्हणतो की, “शोषण काय असतं हे मला चांगलंच माहितीये. कारण मी या यातनेतून गेलोय. माझ्यावर झालेला अत्याचार हा लैंगिक नसला तरी ते एकप्रकारचं शोषणच होतं. या कटू प्रसंगाबद्दल माहिती देताना सैफ सांगतो की, २५ वर्षांपूर्वी करियरची सुरुवात करत असताना माझेही शोषण झालं होतं. त्या गोष्टीची आठवण झाली तरी मला आजही राग येतो. बऱ्याच लोकांना ही गोष्ट समजणार नाही. कारण इतरांचे दुःख समजून घेणे, ही कठिण गोष्ट असते. मी या गोष्टीबाबत कुणाशीच बोलत नाही. आपल्याला महिलांचा सन्मान राखायला पाहीजे”

- Advertisement -

सध्या मी टूच्या माध्यमातून ज्या महिला पुढे येत आहे, ते अतिशय योग्य आहे. परिवर्तनासाठी असे बदल आवश्यक असतात. बऱ्याच पुरुषांना महिलांसोबत नीट व्यवहार करता येत नाही. आपल्या विचारात बदल करुनच आपण या समस्येशी लढू शकतो, असेही सैफ याने सांगितले आहे.

…आता अशा लोकांसोबत काम करणार नाही

नुकतेच साजिद खानवर देखील लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर बिपाशा बसूने देखील साजिद महिलांशी चांगली वर्तणूक करायाचा नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. हमशक्कल या सिनेमात सैफ आणि बिपाशाने एकत्र काम केले होते. याबद्दल सैफला प्रश्न विचारण्यात आला असता, तो म्हणाला की, हमशक्कलच्या सेटवर असे काही झाल्याचे मला आठवत नाही. मात्र या आरोपांमध्ये तथ्य असेल तर हे सहन करण्याच्या पलीकडे आहे. यापुढे जात सैफ म्हणाला की, महिलांसोबत गैरव्यवहार करणाऱ्या लोकांसोबत मी यापुढे काम करणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -