घरमनोरंजनया संगीतकार तिकडीने सोडली 'बाहुबली'ची ही बहुचर्चित फिल्म

या संगीतकार तिकडीने सोडली ‘बाहुबली’ची ही बहुचर्चित फिल्म

Subscribe

साहो हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता मात्र संगीतकार शंकर एहसान लॉय यांच्यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठा धक्का बसला

बाहुबली चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता प्रभासचा आगामी साहो चित्रपट यावेळी चर्चेत आला आहे. दोन वर्षाच्या दिर्घ काळानंतर काही दिवसांपुर्वीच चित्रपट प्रदर्शनाची तारिख जाहीर करण्यात आली. याच चित्रपटासंबधित एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या चित्रपटाला संगीत देणारे संगीतकार शंकर- एहसान -लॉय यांनी माघार घेतली आहे. या बद्दलची माहिती त्यांनी स्वतः ट्वीटरवरून देत साहोच्या संपुर्ण टीमला शुभेच्छा देखील दिल्या आहे.

- Advertisement -

साहो हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता मात्र संगीतकार शंकर एहसान लॉय यांच्यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षापासून या चित्रपटावर काम सुरू होते. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटात अॅक्शन करताना दिसणार असून दुहेरी भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

प्रभास आणि श्रद्धा शिवाय या चित्रपटात नील नितिन मुकेश, जैकी श्राफ, मंदिर बेदी, अरुण विजय, आणि संपत राज यासारखे कलाकार दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीतने केले असून हा चित्रपट तमिल, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -