घरमनोरंजनमराठी कळत नाही; इंग्लिशमध्ये सांगू, रिंकूला इंग्रजीत एवढे गुण?

मराठी कळत नाही; इंग्लिशमध्ये सांगू, रिंकूला इंग्रजीत एवढे गुण?

Subscribe

रिंकू राजगुरूने बारावीच्या परिक्षेत चांगले यश संपादित केले आहे.

सैराट या चित्रपटातून रिंकूला खरी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातून ती आर्ची या नावाने जगप्रसिद्ध झाली. नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाने रिंकूला जगभरात ओळख निर्माण करून दिली. सैराट या चित्रपटामुळे प्रत्येकाच्या मनात घर करणाऱ्या आर्चीने म्हणजेच रिंकू राजगुरूने बारावीच्या परिक्षेत चांगले यश संपादित केले आहे.

रिंकू इयत्ता दहावीला असताना दहावीचा निकाल लागल्यानंतर ही आर्चीच्या निकालाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. रिंकूला दहावीत ६६.४० टक्के मार्क मिळाले होते.

- Advertisement -

त्यावेळी रिंकूच्या सैराट चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याने तिला शाळेत जाता आले नव्हते. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याचे रिंकूने त्यावेळी सांगितले होते. मात्र ही कसर रिंकूने बारावीच्या परीक्षेत ६०० पैकी ५३३ गुण मिळवत भरून काढली.

- Advertisement -

राज्य शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत घेण्यात आलेली परीक्षा रिंकूनेही दिली होती. यात तिला चांगले यश मिळाले आहे. रिंकूने आर्टस ही शाखा निवडली होती. या शाखेतून तिला ८२ टक्के मिळाले आहे.

याच बारावी परिक्षेच्या दरम्यान रिंकूचा कागर हा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वी म्हणजे १४ फेब्रुवारीला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची डेट पुढे ढकलण्यात आली होती.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -