घरमुंबईडॉ. पायल तडवी प्रकरण; नायर रुग्णालयाबाहेर निषेध

डॉ. पायल तडवी प्रकरण; नायर रुग्णालयाबाहेर निषेध

Subscribe

नायर रुग्णालयाबाहेर डॉ. पायल तडवी हिच्या कुटुंबासह अनेक संघटनानी पायल हिला न्याय मिळावा यासाठी निषेध व्यक्त केला आहे.

नायर हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी या २६ वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. याप्रकरणी आता सर्वच पातळीवर निषेध व्यक्त केला जात आहे. डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त केला जात असताना आज, सोमवारी नायर हॉस्पिटलच्या आवारात अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत पायलच्या न्यायासाठी निषेध व्यक्त केला आहे. डॉ. पायल तडवी हिला न्याय मिळाला पाहिजे. तिच्या फरार आरोपींना तात्काळ अटक करा. तिला न्याय द्या, अशा घोषणा दिल्या जात आहे. तिची आत्महत्या नसून ही हत्या आहे, असे देखील बोले जात आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

डॉ. पायल तडवी या नायर हॉस्पिटलमध्ये पीजीच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. हॉस्पिटलच्याच आवारातील वसतीगृहात त्या राहत होत्या. पण, तिथे पहिल्या दिवसापासून डॉ. आहुजा, डॉ. मेहेर आणि डॉ. खंडेलवाल यांनी जातीवरुन डॉ. पायलला त्रास देण्यात सुरूवात केली, अशी तक्रार डॉ. पायल यांच्या आईने केली आहे. याबाबत पायल यांनी हॉस्पिटलचे अधिष्ठाते, वसतीगृहाच्या वॉर्डन आणि व्याख्याते यांच्याकडे तक्रार केली होती. पण, तरीही छळ न थांबल्याने त्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वसतीगृहातील राहत्या घरात गळफास घेऊन डॉ. पायल यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी आता निषेध व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

वाचा – डॉ. पायल तडवी आत्महत्या; आरोपी म्हणतायत ‘आमचीही बाजू ऐकून घ्या’

वाचा – डॉ. पायल तडवी आत्महत्या; तीनही आरोपी डॉक्टर फरार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -