घरमनोरंजन'तान्हाजी'च्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांची धमकी

‘तान्हाजी’च्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांची धमकी

Subscribe

तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरचा वाद, जितेंद्र आव्हाड यांची तान्हाजीच्या दिग्दर्शकाला धमकी....

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचे पात्र असलेल्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट येत आहे. दिग्दर्शक ओम राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून कालच त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. मात्र या ट्रेलरवरून शिवप्रेमी, काही संघटना आणि राजकीय नेते चांगलेच भडकलेले आहेत. इतिहासात नसलेल्या गोष्टी चित्रपटात अंतर्भुत केल्यामुळे शिवप्रेमींचा भडका उडालेला दिसतोय. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तान्हाजीचे दिग्दर्शक ओम राऊत यांना ट्विटरवरून धमकी दिली आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच संभाजी ब्रिगेडने देखील चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेप घेतला आहे. ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एक व्यक्ती लाकूड फेकून मारताना दाखवलेली आहे. इतिहासात असा कोणता प्रसंग आहे का? असल्यास त्याची माहिती देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भुमिकेत काजोल आहे. काजोलच्या तोंडी देखील मराठे ब्राह्मणांच्या जाणव्यांचे रक्षण करतात, असे वाक्य घालण्यात आले आहे. या वाक्यावर देखील संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतलेला आहे. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील चित्रपटातील संदर्भहीन गोष्टी काढून टाकण्याची मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन ओम राऊत यांना धमकीवजा इशारा दिला आहे. यात ते म्हणतात की, “ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल,” असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकचं नाही तर “याला धमकी समजली तरी चालेल,”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -