घरव्हिडिओभाजपचे नगरसेवक कमलेश बोडके सेनेच्या गळाला

भाजपचे नगरसेवक कमलेश बोडके सेनेच्या गळाला

Related Story

- Advertisement -

नाशिक महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून भारतीय जनता पक्षाचे पंचवटीतील नगरसेवक कमलेश बोडके यांनी चक्क शिवसेनेच्या वतीने महापौर पदाचा अर्ज दाखल केला आहे. कमलेश बोडके हे बाळासाहेब सानप यांचे समर्थक मानले जातात. बाळासाहेब सानप यांना भाजपने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नव्हती, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्यावतीने निवडणूक लढवली परंतु भाजपच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यानंतर लगेचच सानप यांनी शिवसेनेत प्रवेश करत महापौरपदाची निवडणूक हातात घेतली. भाजपचे सहा नगरसेवक सध्या सानप यांच्या संपर्कात असून त्यातील कमलेश बोडके यांना महापौर पदाची उमेदवारी देण्याची चाल आता खेळली जात आहे.

- Advertisement -