घरमनोरंजननोटबुक चित्रपटाच्या गाण्यामुळे सलमान झाला ट्रोल

नोटबुक चित्रपटाच्या गाण्यामुळे सलमान झाला ट्रोल

Subscribe

नोटबुक चित्रपटातील मैं तारे या गाण्याच्या टीझर प्रदर्शित झाले आहे. मात्र, सलमान खानला त्यामुळे ट्रोल करण्यात आले आहे.

बॉलीवूड सेलिब्रिटी यांचे ट्रोल होण्याचे प्रमाण वाढत आहे. कुठल्याही कारणांमुळे सेलिब्रिटी ट्रोल होताना दिसतात. बॉलीवूडचा दबंग खानच्या आवाजातील त्याच्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटातील ‘मैं तारे’ या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मात्र या गाण्यामुळे सलमानला ट्रोल व्हावे लागले आहे. ‘नोटबुक’ हा चित्रपट २९ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ट्विटर द्वारे दिली माहिती

सलमान खानने यापूर्वी सुद्धा ‘रेस ३’ आणि ‘हीरो’ या चित्रपटांतील गाणांना आवाज दिला आहे. आता तिसऱ्यांदा त्याच्या ‘नोटबुक’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मैं तारे’ हे गाण त्यांने गायले आहे. सध्या फक्त टीझर प्रदर्शिद झाले आहे, आणि लवकरच संपूर्ण गाणे प्रदर्शित होणार आहे. मात्र, सोशल मीडिया युजर्सने सलमानला चांगलेच ट्रोल केले आहे. युजर्सने हे गाणे पसंतीस उतरले नसल्यामुळे या गाण्यावरुन अनेक मीन्ससुद्धा व्हायरल होत आहे.

- Advertisement -

Salman Khan sings again… For his forthcoming production #Notebook… Here’s the teaser of the song #MainTaare: pic.twitter.com/qlhtygqhSQ

— taran adarsh (@taran_adarsh) March 16, 2019

- Advertisement -

युजर्सनी दिल्या प्रतिक्रिया

काही युजर्सनी बास रे बास… आता सहन होत नाही, असे म्हंटले आहे. तर काहीनी सलमानच्या आवाजात एडिट केल्याचे ही आरोप केले आहे. तसेच काहींनी सेल्फिश या गाण्यांशी तुलना केली आहे. सेल्फिश गाण देखील सलमान खानने गायले होते आणि ते ही फ्लॉप झाले होते.

रहेन दे भाई…auto tuner रो रहा है.??

एक बार बेबे सेल्फिश..??

— आनंद कुमार (@anandrajanandu7) March 16, 2019

आतिफ असलमचे गाण काढले

नोटबुक चित्रपटासाठी पाकिस्तानी गायक आतिफ असलम याचे गाण होते. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर ते गाण काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्या जागी ‘मैं तारे’ हेच गाण सलमान खानने त्याच्या आवाजात गायल्याचे पाहायला मिळत आहे. पण युजर्सना ते आवडले नसल्यामुळे सलमानला त्यांनी ट्रोल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -