घरमनोरंजन'ब्रीद: इनटू द शॅडोज'मधील नित्या मेननचा नवा कॅरेक्टर टीझर प्रदर्शित

‘ब्रीद: इनटू द शॅडोज’मधील नित्या मेननचा नवा कॅरेक्टर टीझर प्रदर्शित

Subscribe

अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या आगामी ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ सीझन 2ची चर्चा सर्वत्र असतानाच, प्राइम व्हिडिओने या मालिकेचा एक नवीन कॅरेक्टर टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये नित्या मेननला आभाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये, प्रेक्षकांनी आभाला आपल्या कुटुंबाचे रक्षण करणारी एक प्रेमळ पत्नी आणि काळजी घेणारी आई म्हणून पाहिले. पण आता सीझन 2मध्ये, प्रेक्षकांना आभाचा कधीही न पाहिलेला अवतार पाहायला मिळेल, जिथे आपल्या कुटुंबाला वाईट लोकांपासून वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते. या टीझरमध्ये ‘कोणतीही समस्या इतकी मोठी नसते, कि ती सोडवू शकत नाही!’ टिझरमध्ये आभाचा डायलॉग प्रेक्षकांना तिच्या हेतूंबद्दल नक्कीच विचार करायला भाग पाडेल.

या नवीन टिझरमध्ये, एका अनपेक्षित परिस्थितीत असलेली आभा, अविनाश आणि कुटुंबाला अविनाशच्या बदललेल्या अहंकारापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. आभाचा तिच्या कुटुंबाला जयच्या वाईट हेतूंपासून वाचवण्याच्या प्रयत्नांना यश येईल का? की ती आणखी गोंधळून जाईल?

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

- Advertisement -

अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, आठ भागांची हि मालिका मयंक शर्मा यांनी दिग्दर्शित केली असून, अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत सीझन 2ची सह-निर्मितीदेखील केली आहे. ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ सीझन 2हा एक साइकोलॉजिकल थ्रिलर आहे ज्यामध्ये अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन, नवीन कस्तुरिया, सैयामी खेर आणि इवाना कौर मुख्य भूमिका साकारताना दिसतील. ही अमेझॉनची बहुप्रतिक्षित मालिका ९ नोव्हेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर भारतासह जगभरातील २४० देशांमध्ये रिलीज होईल.


हेही वाचा :

‘हम दिल दे चुके सनम’पासून ‘PS-1’पर्यंत ‘या’ चित्रपटांसाठी निर्मात्यांची पहिली निवड नव्हती ऐश्वर्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -