घरमनोरंजनOscar Nominations : ऑस्कर नामांकन शर्यतीत '12 वी फेल' झाला पास

Oscar Nominations : ऑस्कर नामांकन शर्यतीत ’12 वी फेल’ झाला पास

Subscribe

12 वी फेल चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत नामांकन मिळाले आहे. याबाबतची माहिती अभिनेता विक्रांत मेस्सीकडून देण्यात आली आहे.

मुंबई : विक्रांत मेस्सीने प्रमुख भूमिका साकारलेला ’12 वी फेल’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अल्पावधीतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर जगभरातही चांगली कमाई केली. अभिनेता विक्रांत मेस्सी हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. आजवर त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली आहेत, असे असताना आता या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (Oscar Nominations: ’12th Fail’ received nominations in the Oscar race)

हेही वाचा – रश्मिका, काजोलनंतर आलियाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

12 वी फेल चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत नामांकन मिळाले आहे. याबाबतची माहिती अभिनेता विक्रांत मेस्सीकडून देण्यात आली आहे. प्रमोशन न करता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित करण्यात आला होता. तर या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. ज्यामुळे हा चित्रपट खूप कमी स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु, या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता सर्वच या स्तरांतून या चित्रपटाचे कौतुक करण्यात आले. भावनिक असलेल्या हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. आजही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. आता ऑस्करच्या शर्यतीत सिनेमाचा समावेश झाल्याने या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

12 वी फेल हा चित्रपट 96 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवण्यात आला आहे. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी स्वतंत्र नामांकन देण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना विक्रांतने स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. ऑस्कर नामांकनांच्या शर्यतीत आता या सिनेमाचा समावेश झाल्याने सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. याबाबत बोलताना अभिनेता विक्रांत मेस्सी म्हणाला की, 12 वी फेल हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल यावर आमचा विश्वास होता. पण प्रेक्षकांचा या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद ही आमच्यासाठी नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. अनेक प्रेक्षक दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा हा सिनेमा पाहायला येत आहेत. प्रेक्षकांना फक्त मनोरंजन नको आहे तर उत्तम कथानकही हवे आहे हे यावरुन सिद्ध झाले आहे.

- Advertisement -

12वी फेल’ या चित्रपटाची कथा अनुराग ठाकूर यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेतली आहे. ज्यामध्ये IPS अधिकारी मनोज कुमार यांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला आहे. चंबळमधील एका तरुणाने बारावीत नापास होऊनही आयपीएस अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न कसे पूर्ण केले ही प्रेरणादायी कथा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अनंत जोशी, अंशुमन पुष्कर, मेधा शंकर आणि गीता अग्रवाल यांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -