घरमनोरंजनअर्जुनने मलायकासाठी केलं असं काही की....

अर्जुनने मलायकासाठी केलं असं काही की….

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा त्यांच्या नात्यामुळे सतत चर्चेत असतात. हे दोघेही मागील 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे दोघंही एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतात. दरम्यान, नुकताच मलायका आणि अर्जुनचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अर्जुन मलायकाला घरी सोडण्यासाठी आलेला दिसत आहे.

मलायका-अर्जुनचा नवा व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनशिपला जवळपास 6 वर्ष पूर्ण झाली असून ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हे जोडपे कारमध्ये बसलेले दिसत आहे. मलायका अरोराला तिच्या अपार्टमेंटमध्ये सोडण्यासाठी अर्जुन कपूर आल्याचं दिसत आहे. मलायकाबद्दल अर्जुनला वाटणारी काळजी पाहून चाहते अर्जुन कपूरचं खूप कौतुक करताना दिसत आहे. अनेकजण त्याला परफेक्ट बॉयफ्रेंड म्हणताना दिसत आहे.

- Advertisement -

6 वर्षांपासून करतायत एकमेकांना डेट

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी मलायकाने अर्जुनसोबतचे नाते अधिकृत केले. अर्जुन आणि मलायकाच्या वयात 13 वर्षांचे अंतर असूनही त्यांची केमिस्ट्री खूप छान आहे. दरम्यान, अर्जुन कपूर लवकरच ‘मेरी पटनी का रिमेक’मध्ये दिसणार आहे.


हेही वाचा :

तुझा फोन बंद कर…. व्हिडीओ काढणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -