घरक्राइमPoonam Pandey Return : आयएफटीडीए अध्यक्ष पूनम पांडेवर संतापले; कडक कारवाईची मागणी

Poonam Pandey Return : आयएफटीडीए अध्यक्ष पूनम पांडेवर संतापले; कडक कारवाईची मागणी

Subscribe

मुंबई : अभिनेत्री आणि मॅाडेल पूनम पांडे हिचे सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन झाले, अशी बातमी शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देण्यात आली होती. पूनम पांडेच्या निधनाने अनेक लोकांना धक्का देखील बसला. मात्र या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर 24 तासांनी पूनम पांडे हिने स्वत: तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली. पूनम पांडेच्या या स्टंटबाजीनंतर आता तिच्यावर टीका होताना दिसत आहे. इंडियन फिल्म अँड टीव्ही डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देत पूनम पांडे आणि तिच्या पीआर एजन्सीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Poonam Pandey Return IFTDA president angry with Poonam Pandey Strict action demanded)

हेही वाचा – Pune News: नाटकात रामायणाचा विपर्यास; ललित कला केंद्र प्रमुखांसह 6 जणांना अटक

- Advertisement -

अशोक पंडित यांनी म्हटले की, ‘अभिनेत्रीने ज्या प्रकारे गर्भाशयाच्या सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची बातमी जाहीर केली, ती अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. तिने लोकांच्या भावनांशी खेळ केला आहे. गर्भाशयाच्या सर्व्हायकल कॅन्सरशी झुंजणाऱ्या सर्वांची तिने खिल्ली उडवली आहे. हा एक अतिशय गंभीर आजार आहे. या गंभीर आजाराविरुद्ध एकत्र काम करणाऱ्या भारत सरकार, डॉक्टर आणि परिचारिका यांच्या मेहनतीची आणि प्रयत्नांची त्यांनी खिल्ली उडवली आहे.

कारवाई व्हायला हवी

अशोक पंडित म्हणाले, ‘अभिनेत्रीवर कठोर कारवाई व्हायला व्हावी, अशी माझी मनापासून मागणी आहे. कारण देशातील जनतेशी खोटे बोलल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. काल तिच्या निधनाचे वृत्त समजल्यावर दु:ख झालेल्या उद्योग जगतातील लोकांशी खोटे बोलणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अभिनेत्रीने विनाकारण लोकांच्या भावनांशी खेळ केला आहे. या कारवाईचा तिचा हेतू केवळ पीआर होता. त्यामुळे ज्या काही पीआर एजन्सी या प्रकरणाचा भाग होत्या आणि ज्यांनी अशा कृत्यांना प्रोत्साहन दिले आहे, त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असेही अशोक पंडित म्हणाले.

- Advertisement -

अखिल भारतीय सिने कामगार संघटनेने काय म्हटले?

पूनम पांडेने केलेल्या बनावट पीआर स्टंटवर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, ‘मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा बनावट पीआर स्टंट अत्यंत चुकीचा आहे. स्वत: ला प्रोत्साहन देण्यासाठी तिने गर्भाशयाच्या सर्व्हायकल कॅन्सरचा वापर करणे चुकीचे आहे. तिच्या मृत्यूच्या बातमीनंतर आता भारतीय चित्रपटसृष्टीतील कोणत्याही मृत्यूच्या बातमीवर लोक विश्वास ठेवणार नाही. चित्रपटसृष्टीतील कोणीही पीआरसाठी एवढ्या खालच्या पातळीपर्यंत जात नाही. असे असतानाही पूनम पांडेच्या मॅनेजरने खोट्या बातमीची पुष्टी केली होती. त्यामुळे वैयक्तिक फायद्यासाठी (PR) कोणीही त्यांच्या स्वत:च्या मृत्यूच्या बातम्यांचा गैरफायदा घेऊ नये म्हणून पूनम पांडे आणि तिच्या व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर नोंदवावा. कारण या अफवेनंतर संपूर्ण देशासह भारतीय चित्रपटसृष्टीनेही तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा – Jarange Vs Bhujbal : तुझं वय झालं आहे, गप्प बस नाही तर टपकन…; जरांगेंकडून पुन्हा एकेरी उल्लेख

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

पूनम पांडेने काय म्हटले?

पूनम पांडेने स्वत: तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली. यावेळी तिने सर्वांची माफी मागताना म्हटले की, “मी जिवंत आहे, सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे सर्व केले. हजारो महिलांचा सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू होतो. कारण त्यांना माहिती नसतं की काय करायचं, पण हा कॅन्सर बरा होऊ शकतो. फक्त तुम्हाला काही टेस्ट करून एचपीव्ही व्हॅक्सिन घ्यायची असते. सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपल्याला प्राण गमवावे लागू नये म्हणून आपल्याला हे करायला हवं. आपण एकत्र मिळून या कॅन्सरबाबत जनजागृती करूया. तुम्ही माझ्या वेबसाईटला जरुर भेट द्या. सर्व्हायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी (http:www.poonampandeyisalive) ही वेबसाईट लॅान्च केली आहे,” असं पूनम पांडेनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -