घरमहाराष्ट्रपुणेPune News: नाटकात रामायणाचा विपर्यास; ललित कला केंद्र प्रमुखांसह 6 जणांना अटक

Pune News: नाटकात रामायणाचा विपर्यास; ललित कला केंद्र प्रमुखांसह 6 जणांना अटक

Subscribe

शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात सुरू असलेल्या एका नाटकावर आक्षेप घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गोंधळ घालत ते बंद पाडले.

पुणे: शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात सुरू असलेल्या एका नाटकावर आक्षेप घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गोंधळ घालत ते बंद पाडले. या नाटकातून राम आणि सीतेची बदनामी केली जात असल्याचा आरोप अभाविपने केला. या आरोपावरून विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या नाटकावरून शुक्रवारी रात्री विद्यापीठात गोंधळ उडाला होता. (Pune News Ramayana twist in drama 6 persons including head of fine art center arrested)

ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्रने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. नाटकातल संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला आणि नाटक बंद पाडण्यात आलं. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाटकाशी संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाटकाचे दिग्दर्शक, काम करणारे कलावंत यांच्यासह ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांना अटक करण्यात आली आहे. दुपारी न्यायालयात त्यांना हजर करण्यात येईल.

- Advertisement -

नेमकं घडलं काय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून 2 फेब्रुवारीला रामायणात काम करणाऱ्या कालकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कालकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आला होता. मात्र, या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला. यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाणदेखील करण्यात आली. या नाटकांत राम आणि सीता यांच्यासंदर्भात काही आक्षेपार्ह दृष्य दाखवण्यात आली होती. त्यामुळे हा सगळा राडा झाला.

कला क्षेत्रातून प्रतिक्रिया

अभिनेते किरण माने म्हणाले, ललित कला केंद्र पुणे येथे नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही धर्मांध गुंडांनी हातात दांडकी घेऊन स्टेजवर घुसून हल्ला केला आणि नाटक बंद पाडले. आमच्या देवाचा अपमान करणारे नाटक तुम्ही करत आहात, असा त्यांनी आरोप केला.

- Advertisement -

विभा दीक्षित देशपांडे लिहितात, एखादी कलाकृती, कलाविष्कार न पटणे न अडवणे, राग येणे, भावना दुखावणे हे मला मान्य आहे. तो निषेध व्यक्त करण्याचे विविध मार्ग लोकशाही व्यवस्थेत आहेत. चालू नाटक बंद पाडणे, गोंधळ घालणे, धक्काबुक्की करणे योग्य नाही.

( हेही वाचा Sanjay Raut: आजच्या प्रकारानंतर गृहमंत्र्यांना उत्तर द्यायला तोंड उरलंय का? राऊतांचा फडणवीसांवर घणाघात )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -