घरताज्या घडामोडीPorn film Case: राज कुंद्राच्या अडचणीत आणखीन वाढ; चार दिवस जामिनाची पाहावी...

Porn film Case: राज कुंद्राच्या अडचणीत आणखीन वाढ; चार दिवस जामिनाची पाहावी लागणार वाट

Subscribe

पॉर्न फिल्मप्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. न्यायालयीन कोठडीत असणारा राज कुंद्राच्या विरोधात २०२० मधील तक्रारीवरून आता महाराष्ट्र सायबर सेलमध्ये पॉर्न फिल्मप्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणातील अटक टाळण्यासाठी राज कुंद्राने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार होती, मात्र ती टाळण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणात राज कुंद्राला जामीनासाठी चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.

२०२०मध्ये महाराष्ट्र सायबर सेलने एका व्यक्तीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता त्यात राज कुंद्रा याचे नाव समोर आले होते. प्रॉपर्टी सेलने अटक केलेल्या राज कुंद्राने याप्रकरणातील जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज टाळण्यात आली असून ७ ऑगस्ट रोजी राज कुंद्राच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत राज कुंद्राला तुरुंगात राहावे लागणार आहे. पॉर्न फिल्म प्रकरणात प्रॉपर्टी सेलच्या आता तो अटकेत असून तो तुरुंगात आहे.

- Advertisement -

यापूर्वी सध्या गाजत असलेल्या पॉर्न फिल्मप्रकरणात मुंबईचे एस्प्लेनेड कोर्टने (Mumbai’s Esplanade Court ) राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळला होता. राज कुंद्रा हा साक्षीदारांना प्रभावित करू शकतो असा युक्तीवाद पोलिसांनी कोर्टात केला. या युक्तीवादाच्या आधारे राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. तसेच मुंबई पोलिसांपाठोपाठ सेबीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर मोठी कारवाई केली. ट्रेडिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीने शिल्पा शेट्टीला ३ लाखांचा दंड ठोठावला. याशिवाय राज कुंद्रा, रिपु कुंद्रा आणि त्यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवरही सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.


हेही वाचा – राज कुंद्राने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ३ हजार कोटींचा घोटाळा केला, राम कदम यांचा गंभीर…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -