राज कुंद्राने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ३ हजार कोटींचा घोटाळा केला, राम कदम यांचा गंभीर आरोप

गेमच्या वितरणामध्ये कोणाकडून ३० लाख तर कोणाकडून २० ते ३० लाख असे पैसे आकारले गेले - राम कदम

Raj Kundra scammed Rs 3,000 crore through online game serious allegations by Ram Kadam
राज कुंद्राने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ३ हजार कोटींचा घोटाळा केला, राम कदम यांचा गंभीर आरोप

उद्योजक राज कुंद्राच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. अश्लील चित्रपट चित्रिकरण आणि ऍप्सवर विकण्याच्या आरोपाखाली मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राला अटक केली आहे. राज कुंद्राने ऑनलाईन गेमिंग्च्या माध्यमातून ३ हजार कोटीचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केला आहे. राज कुंद्राची कंपनी वियान इंडस्ट्रीने ऑनलाईन गेम GOD च्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली असल्याचे गंभीर आरोप भाजप आमदार राम कदम यांनी घेतली आहे. मुंबई गुन्हे शाखा राज कुंद्रा अश्लील फिल्म प्रकरणावर तपास करत असून रोज नवे नवे पुरावा पोलिसांच्या हाती लागत आहेत.

भाजप आमदार राम कदम यांनी पत्रकार परिषदेत राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. राम कदम म्हणाले की, राज कुंद्राने ऑनलाईन गेमच्या प्रचारासाठी पत्नी शिल्पा शेट्टीचा फोटो आणि नावाचा उपयोग केला होता. तसेच राज कुंद्राने ऑनलाईन गेम (GOD) गैम्बलिंग गेमच्या माध्यमातून हजारो करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. पैसे जमवणे आणि पैशांच्या वितरणामध्ये गरिबांची फसवणूक केली आहे. शिल्पा शेट्टीच्या प्रसिद्धीचा आम्ही सन्मान करतो परंतू गेमचा प्रचार करण्यासाठी शिल्पा शेट्टीच्या चेहऱ्याचा वापर राज कुंद्राने केला आहे.

३ हजार कोटींचा घोटाळा

राम कदम यांनी म्हटलं आहे की, राज कुंद्रीचा वियान नावाची कंपनी असून त्याचे ते संस्थापक आहेत. वियान कंपनीचा गेम ऑफ डॉट (Game Of Dots) नावाचा ऑनलाईन गेम आहे. या गेमला अधिकृत ऑनलाईन गेम सांगण्यात आले आहे. वियान कंपनीच्या लेटर हेडवर शिल्पा शेट्टीच्या फोटोचा वापर प्रमोशन करण्यासाठी करण्यात आला आहे. तसेच हा गेम सरकारमान्य असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जिंकल्यावर पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारे देशातून हजारो नागरिकांची फसवणूक करण्यात येत असून २५०० ते ३००० करोड रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

एका व्यक्तीकडून ३० लाखांची फसवणूक

राम कदम यांनी पुढे म्हटलं आहे की, आपल्या संविधानाने कोणाची फसवणूक करण्याचा अधिकार दिला नाही. गेमच्या वितरणामध्ये आणि पैशांच्या व्यवहारात मोठी फसवणूक कऱण्यात आली आहे. गेमच्या वितरणामध्ये कोणाकडून ३० लाख तर कोणाकडून २० ते ३० लाख असे पैसे आकारले गेले. काही लोकांनी डिस्ट्रीब्यूटरशीप घेतली तर यामधील काही लोकांना कळाले की यामध्ये फसवणूक करण्यात येत आहे. अशा प्रकारे राज कुंद्रा लोकांची फसवणूक करत असून राज कुंद्राला फसवणूक करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवालही राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

पैशांची मागणी केल्यावर मारहाण

राज कुंद्राचे गेम डिस्ट्रीब्यूटर जेव्हा त्याच्याकडे पैशांचा तगादा लावयला लागले होते तेव्हा राज कुंद्राच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती देण्यात आली आहे. राम कदम यांनी म्हटलं आहे की, राज कुंद्राच्या विरोधात ही पत्रकार परिषद आयोजि केली नसून राज कुंद्राला लोकांची फसवणूक करण्याचा अधिकार कोणी दिला हा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे पत्रकार परिषद आयोजित केली आहे. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठीत असून अश्लील फिल्म चित्रिकरण करणे आणि त्याचा व्यापार करण्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला आहे.