घरताज्या घडामोडीMonsoon Update : भारतात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील पावसाचा IMD ने मांडला अंदाज

Monsoon Update : भारतात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील पावसाचा IMD ने मांडला अंदाज

Subscribe

भारतात ऑगस्ट आणि येत्या सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनची हजेरी ही काही भागात सामान्य तर काही ठिकाणी अतिवृ्ष्टी अशा स्वरूपाची असेल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र (IMD) मार्फत देण्यात आली आहे. या कालावधीत मॉन्सून हा ९५ टक्के ते १०५ टक्के असा सरासरी (LPA) स्वरूपात असणार आहे. ऑगस्टमध्ये मॉन्सून ९४ टक्के ते १०६ टक्के असा सरासरी असणार आहे. आतापर्यंतच्या हवामान विभागाच्या मॉन्सूनच्या आकडेवारीनुसार १९६१ ते २०१० या कालवधीत मॉन्सूनचे प्रमाण हे २५८.१ मिमी इतके राहिले आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात मध्य भारतात सामान्य अशा स्वरूपाचा असणार आहे. तर देशाच्या अनेक भागात सामान्य आणि सरासरीपेक्षा सामान्य अशा स्वरूपाचा असेल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या कालावधीत देशाच्या अनेक भागात सामान्य ते अतिवृष्टी अशा स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

ला नीनाचा प्रभाव राहणार ?

हवामान विभागाने मांडलेल्या अंदाजानुसार ला नीनाचा प्रभाव हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही कायम असणार आहे. हा परिणाम २०२२ च्या थंडीच्या हंगामातही कायम राहील असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या ला नीनाचा प्रभाव जाणवायला सुरूवात झाली आहे. हा प्रभाव मॉन्सूनच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यंदाचा मॉन्सून लांबणार की नाही याबाबत आत्ताच खात्रीलायक पद्धतीने सांगता येत नाही. पण ला नीनाचा प्रभाव येत्या कालावधीसाठी कायम राहील. परिणाम चांगला मॉन्सून होऊ शकतो असेही ते म्हणाले. ला नीनाचा प्रभाव म्हणूनच पश्चिम बंगालच्या खाडीत काही वादळांची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे मत प्रादेशिक हवामान केंद्राचे महासंचालक ए मोहपात्रा यांनी सांगितले.

येत्या दोन दिवसांमध्ये पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पश्चिमी क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याआधीही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानेच राजस्थानात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता.

- Advertisement -


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -